मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Shocking ! दुकानात पेन आणण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय मुलीवर अत्याचार, चाकूचा धाक दाखवत नराधमाने केलं गैरकृत्य

Shocking ! दुकानात पेन आणण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय मुलीवर अत्याचार, चाकूचा धाक दाखवत नराधमाने केलं गैरकृत्य

 मुलगी घरी एकटीच असताना तो घरात शिरला. त्याने बॉटलमधून आणलेले पाणी तिला पाजले. त्यानंतर चक्कर येऊन तिला झोप आली.

मुलगी घरी एकटीच असताना तो घरात शिरला. त्याने बॉटलमधून आणलेले पाणी तिला पाजले. त्यानंतर चक्कर येऊन तिला झोप आली.

Minor girl abused in beed: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही थांबताना दिसत नाहीयेत. आता बीडमधून एक संतापजनक बातमी समोर आली आहे.

बीड, 3 नोव्हेंबर : पेन आणण्यासाठी गेलेल्या ऊसतोड कामगारांच्या (sugarcane worker) 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 20 वर्षीय तरुणाने अत्याचार (minor girl abused) केल्याची संतापजनक घटना समोर आलीय. ही घटना बीडच्या वडवणी तालुक्यात (Vadavani Taluka beed) घडली आहे. या प्रकरणी वडवणी पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. (Minor girl abused in beed)

वडवणी तालुक्यातील 13 वर्षीय अल्पवयीन पीडितेचे आई-वडील, ऊसतोडणीसाठी कारखान्याला गेलेले. पीडित मुलगी नातेवाईकांसोबत गावातील घरीच राहते. 30 ऑक्टोंबर दिवशी पीडित ही गावातील किराणा दुकानावर पेन आणण्यासाठी गेली होती. यादरम्यान दुकानावर असलेल्या 20 वर्षीय नराधमाने, पीडितेचे आई-वडील कारखान्याला गेल्याची व पीडिता एकटी असल्याची संधी साधून, दुकानाच्या मागच्या बाजूला, चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बळजबरी अत्याचार केला आहे.

दरम्यान तिने घरी आल्यानंतर घडलेल्या प्रसंगाची माहिती तिच्या चुलतीला दिली. त्यानंतर तिने पीडितेच्या आई वडीलांना हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर, तिचे आई-वडील देखील गावी आले आहेत. याप्रकरणी 13 वर्षीय अल्पवयीन पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून, गावातील गणेश संदिपान गोंडे या 20 वर्षीय नराधम किराणा दुकानदारावर, कलम 376, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि ऍट्रॉसिटी ऍक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात महिला अन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

पुण्यात शिक्षकाचं अल्पवयीन मुलीसोबत 3 महिने घृणास्पद कृत्य

पुण्यातील एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 13 जणांनी सामूहिक अत्याचार केला होता. महाराष्ट्राला हादरून सोडणारी ही घटना ताजी असताना, शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील वानवडी परिसरात एका शिक्षकाने शिकवणीसाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नराधम आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने संबंधित प्रकार आपल्या आईला सांगितला आहे. मुलीवर झालेल्या अत्याचाराची कहाणी ऐकून पीडितेच्या आई वडिलांना देखील धक्का बसला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात जात 52 वर्षीय नराधम शिक्षकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

5 रुपयांचं नाणं देऊन 5 वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

चार दिवसांपूर्वी बिहारमधील बगहा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली होती. बगहा जिल्ह्याच्या सेमरा पोलीस ठाणे अंतर्गत एका ज्येष्ठाचं धक्कादायक कृत्य समोर आलं. 65 वर्षीय ज्येष्ठ व्यक्ती मुलीचा गैरफायदा घेत होता. यादरम्यान गावकऱ्यांनी आरोपीला पकडून बांधलं आणि त्याला मारहाण केली. घटनेबद्दल सूचना सेमरा पोलीस ठाण्याला देण्यात आली. ज्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केलं आहे. ही घटना सेमरा पोलीस ठाणे हद्दीतील सिंगाडी गावातील आहे.

मुलीला घरात घेऊन जाताना गावकऱ्यांनी पाहिलं होतं, यानंतर गावकऱ्यांनी तातडीने मुलीच्या कुटुंबीयांना याची सूचना दिली. ज्यानंतर कुटुंबीय आरोपीच्या घरी मुलीचा शोध घेण्यासाठी पोहोचले. आरोपीने घराचं दार आतून बंद केलं होतं. आवाज दिल्यानंतरही जेव्हा आरोपीने दार उघडलं नाही, त्यानंतर गावकरी दार तोडून घरात शिरले. आणि मुलाला त्याच्यापासून वाचवलं. कुटुंबीयांनी सांगितलं की, मुलीच्या हातात 5 रुपयाचं नाणं दिलं होतं आणि ती ओक्साबोस्शी रडत होती.

First published:

Tags: Beed, Crime