पुणे, 29 जून : सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यातच पुणे विभागातील एक अत्यंत लज्जास्पद घटना समोर आली आहे.
येथील एका रुग्णालयात व्यक्तीने मुलीच्या जन्मामुळे पत्नीला जिवे मारण्याची धमकी दिली आणि नशेच्या अवस्थेत रूग्णालयात गोंधळ घातला. या व्यक्तीचं नाव कृष्णा काळे असं असून त्याने डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना केली. जेव्हा एका कर्मचार्याने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्या कामगारांवर दगडाने हल्ला केला.
हे वाचा-कोरोनामुळे भारतीय क्रिकेटरच्या वडिलांचा मृत्यू; सेहवागने मागितली होती मदत
पुण्यातील बारामतीतील दोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. नंतर आरोपीला अटक करण्यात आली. बारामती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील म्हणाले की, काळे 25 जून रोजी रुग्णालयात आले आणि मुलीला जन्म देण्यावरुन पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. डॉक्टर आणि इतर कामगारांनाही या व्यक्तीने शिवीगाळ केली व धमकावले.
हे वाचा-#BoycottNetflix ट्विटरवर ट्रेंड, हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप
या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, यानंतर त्याला रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले. परंतु 26 जून रोजी तो दारु पिऊन पुन्हा रुग्णालयात आला आणि गोंधळ घालायला सुरुवात केली. बाळू चव्हाण या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने दगडफेक करून कर्मचाऱ्याला जखमी केले. शनिवारी काळे याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपादन - मीनल गांगुर्डे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: #Pune, Female child