मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /धक्कादायक बातमी, रत्नागिरीतील पंधेरी धरण फुटीची मार्गावर, हायअलर्ट जारी

धक्कादायक बातमी, रत्नागिरीतील पंधेरी धरण फुटीची मार्गावर, हायअलर्ट जारी

पंधेरी धरणाची परिस्थिती अतिशय गंभीर असून या धरणाची गळती रोखण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

पंधेरी धरणाची परिस्थिती अतिशय गंभीर असून या धरणाची गळती रोखण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

पंधेरी धरणाची परिस्थिती अतिशय गंभीर असून या धरणाची गळती रोखण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

रत्नागिरी, 07 जुलै: रत्नागिरी जिल्ह्यातील पंधेरी धरणाची (Ratnagiri Panderi Dam leakage) गळती वाढली आहे. त्यामुळे धरणाची भिंत तुटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे धरणाच्या परिसरातील लोकवस्ती खाली करण्यात आली आहे. NDRF च्या पाच टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहे.

पंधेरी धरणाची परिस्थिती अतिशय गंभीर असून या धरणाची गळती रोखण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु मंगळवारी दिवसभर काम करून सुद्धा या धरणाची गळती थांबली नाही. त्यामुळे धरण फुटीचा धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे.

1,56,98,97,00,00,000.00रुपये!मोजता मोजता थकाल,Jeff Bezosयांनी कमवली इतकी संपत्ती

तर दुसरीकडे जिल्ह्यातील प्रशासन मात्र कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे. धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा मदतीसाठी उपलब्ध ठेवण्यात आला आहे. चार रेस्क्यू टीम या ठिकाणी तैनात आहेत.

तसंच एनडीआरएफची एक तुकडी सर्व महसूलचे अधिकारी लघु पाटबंधारे विभागाचे जिल्ह्यातील सर्व अधिकारी या ठिकाणी दाखल आहेत. या धरणाची तीव्रता लक्षात घेऊन सर्व उपाय योजना करण्यात आल्या आहेत.

पुण्याच्या चिमुकलीची भन्नाट कामगिरी; जागतिक विक्रम करत 3 बुकमध्ये नोंदवलं नावं

नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या चार वाड्यांचे स्थलांतर सुद्धा करण्यात आले आहे. परंतु, या ठिकाणाचा धोका मात्र अजूनही कायम आहे. त्यामुळे या ठिकाणचे नागरिक अजूनही भीतीच्या छायेखाली जीवन जगत आहे.

First published:
top videos

    Tags: Maharashtra, Pune