मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /लग्नानंतर अवघ्या 15 दिवसांतच नववधूनं ठोकली धूम, समोर आलं धक्कादायक कारण...

लग्नानंतर अवघ्या 15 दिवसांतच नववधूनं ठोकली धूम, समोर आलं धक्कादायक कारण...

प्रेयसीचे आई-वडील नाहीत. त्यामुळे लग्नात प्रेयसीला गिफ्ट म्हणून सोन्याचे दागिने देण्याची प्रियकराची इच्छा होती. मात्र त्याच्याकडेही पैसे नसल्याने त्याने थेट सोन्याचं दुकान लुटलं.

प्रेयसीचे आई-वडील नाहीत. त्यामुळे लग्नात प्रेयसीला गिफ्ट म्हणून सोन्याचे दागिने देण्याची प्रियकराची इच्छा होती. मात्र त्याच्याकडेही पैसे नसल्याने त्याने थेट सोन्याचं दुकान लुटलं.

लग्नानंतर अवध्या 15 दिवसांतच नववधूनं आपल्या पतीसह सासरच्या मंडळींना नवरंग दाखवले आहेत.

अहमदनगर, 26 जुलै: लग्नानंतर अवध्या 15 दिवसांतच नववधूनं आपल्या पतीसह सासरच्या मंडळींना नवरंग दाखवले आहेत. सासरी आलेल्या नववधूनं प्रियकरासोबत धूम ठोकल्याची घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे ही घटना घडली आहे. ही विचित्र घटना आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा...हनीट्रॅप गँगचा पर्दाफाश! अश्लिल व्हिडिओ शूट करून खंडणीसाठी व्यापारीला ठेवलं होतं डांबून

काय आहे प्रकरण?

झालं असं की, श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथे राहणाऱ्या एका तरुणाशी बारामती तालुक्यातील तरुणीचा 25 जूनला विवाह झाला होता. दरम्यान, नववधूनं चक्क प्रियकरासोबत धूम ठोकली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरुन पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणी प्रियकरासोबत आळंदीला पळाली असून तिथे जाऊन त्या दोघांनी लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. लग्नापूर्वीच तरुणीचे तरडोली गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तरुणी सुमारे दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाली आहे.

...म्हणून प्रियकरासोबत पळून जातात मुली!

मुली घर सोडून प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न का करतात, याचं कारण एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. मुंबई, दिल्ली आणि जयपूरमधील 15 ते 20 वयोगटातील 15 मुलींसंबंधी एक सर्व्हे केला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, संधीची कमतरता आणि किशोरवयात लैंगिक संबंधांना कलंक मानणे आदी कारणं या सर्वेक्षणातून समोर आली आहेत. बहुतांश पालक आपल्या मुलांकडे लक्ष देत नाहीत हे एक महत्वाचं कारण अहवालात दिलं आहे.

पार्टनर्स फॉर लॉ अँड डेव्हलपमेंटनं (पीएलडी) यासंबंधी गेल्या वर्षी अहवाल प्रसिद्ध केला. अल्पवयीन मुलींची संमती असूनही त्यांच्याशी लग्न करणाऱ्या मुलांना कायद्याच्या कचाट्यात अडकवले जाते, अशी धक्कादायक माहितीही या सर्वेक्षणातून समोर आली आहे.

हेही वाचा... बीड हादरलं! पत्नीच्या हत्येची भोगत होता शिक्षा, पॅरोलवर सुटून आल्यानंतर केलं असं

मुलींच्या मनात प्रेमाबद्दल एक वेगळीच भीती असते. त्यामुळं ते बॉयफ्रेंडबद्दल कुणालाही काही सांगत नाहीत आणि घरातून पळून जाऊन लग्न करतात, हे कारणही समोर आलं आहे.

First published:
top videos

    Tags: True love