महाराष्ट्रासाठी धक्कादायक बातमी, एकमेव ग्रीन झोन जिल्ह्यातही कोरोनाचा शिरकाव

महाराष्ट्रासाठी धक्कादायक बातमी, एकमेव ग्रीन झोन जिल्ह्यातही कोरोनाचा शिरकाव

गडचिरोलीत तीन वेगवेगळया ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाइनमधील 3 लोकांचे नमुने हे पॉझिटिव्ह आले आहे.

  • Share this:

गडचिरोली, 18 मे : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. परंतु, गेली दोन महिने कोरोनापासून दूर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.  गडचिरोलीत तीन वेगवेगळया ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाइनमधील 3 लोकांचे नमुने हे पॉझिटिव्ह आले आहे.

लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्पात अटी शिथील करण्यात आल्या आहे. त्यामुळे राज्यात आणि जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना आपली गावी जाण्यास मुभा मिळाली. परंतु, जी लोकं गावी परतली आहे.  प्रवास करून गावी पोहोचलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा -औरंगाबादमध्ये ज्याची भीती होती तेच झालं, कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर

ग्रीन झोन असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही काही नागरिक हे बाहेरून आले होते. खबरदारी  म्हणून प्रशासनाने या लोकांना संस्थात्मक क्वारंटाइन केलं होतं. त्यानंतर त्याचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवले होते. आज क्वारंटाइन केलेल्या तीन जणांचा कोविड- 19 चा अहवाल रविवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.

यामध्ये कुरखेडा येथील वेगवेगळया दोन क्वारंटाइन सेंटरचा व चामोशीमधील एका क्वारंटाइन सेंटरचा समावेश आहे. संबंधित कोरोनाबाधित व्यक्तींना जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण वार्डमध्ये हलविण्यात आले आहे. संबंधित रूग्णांकडून त्यांच्या प्रवासाची तपशील घेणे सुरू आहे.

हेही वाचा -या मुद्द्यावर काँग्रेस आणि विरोधी पक्षाचं एकमत, भाजपनं शिवसेनेवर साधला निशाणा

संबंधित पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांना आरोग्य विभागाकडून 16 मे रोजी जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले होते.

राज्यातला सध्या ग्रीन झोन असलेला गडचिरोली एकमेव जिल्हा होता. परंतु, आता कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे ग्रीन झोनच्या वर्गवारीतून जिल्हा बाहेर आला आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 18, 2020, 10:43 AM IST

ताज्या बातम्या