Home /News /maharashtra /

News18 Lokmat Exclusive : बुलढाण्यात धक्कादायक प्रकार, आदिवासींच्या जमिनी हडपण्याचा सपाटा

News18 Lokmat Exclusive : बुलढाण्यात धक्कादायक प्रकार, आदिवासींच्या जमिनी हडपण्याचा सपाटा

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात सातपुडा पर्वत रांगांमध्ये आदिवासीबहुल भागात आदिवासींच्या जमिनी हडपण्याचा सपाटा काही भूमाफियांकडून लावण्यात आला आहे.

    राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलढाणा, 5 जुलै : बुलढाणा जिल्ह्याच्या शेवटचे टोक असलेल्या सातपुडा पर्वतरांगेत आदिवासी बहुल भागातील आदिवासींच्या जमिनी हडपण्याचा काही भूमाफियांनी सपाटा लावला आहे. तब्बल दीडशे एकर जमीन या भूमाफियांकडून हडपण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात चिचारी गाव परिसरात आदिवासी बांधवांच्या जमिनी आहेत. मात्र येथील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी संगणमत करून काही गैर आदिवासींच्या घशात हे भूखंड घातल्याचा धक्कादायक प्रकार न्यूज18 लोकमतच्या हाती लागलाय. काय आहे संपूर्ण प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात सातपुडा पर्वत रांगांमध्ये आदिवासीबहुल भागात आदिवासींच्या जमिनी हडपण्याचा सपाटा काही भूमाफियांकडून लावण्यात आला आहे. हे गैर-आदिवासी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याला हाताशी धरून या आदिवासींच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात कब्जा करत असल्याचा पाहायला मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील या संपूर्ण प्रकारामध्ये या गैर आदिवासींनी हडपलेल्या या जमिनीवर कोट्यवधी रुपयांचे पीक कर्ज सुद्धा घेतले आहे. एवढेच नाही तर पीक कर्जमाफीचा लाभ सुद्धा या आदिवासींच्या जमिनीवर गैर-आदिवासींकडून घेण्यात आला आहे. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार न्यूज18 लोकमतच्या हाती लागलाय. (ज्याचा त्याचा विठ्ठल, मुख्यमंत्र्यांच्या घरातील फोटो सगळं काही सांगता, अजूनही....) याप्रकरणी आम्ही स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना जेव्हा विचारणा केली तेव्हा त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून याबाबत आदेश आल्यानंतरच कारवाई होईल असं सरकारी उत्तर दिलंय. जिल्ह्याच्या संग्रामपूर भागात भूखंड माफिया मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. 75 भूखंड बनावट नोंदणी क्रमांक वापरून फेरफार नोंदवल्याचे प्रकरण न्यूज 18 लोकमतने उजेडात आणल्यानंतर आता संग्रामपूर तालुक्यातीलच हे दुसरे मोठे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. आदिवासी समाजाच्या या हक्काच्या जमिनी गैर-आदिवासींकडून हडपल्या जात आहेत. मात्र यावर एकही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी चकार शब्द काढायला तयार नाही. त्यामुळे या प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या संवेदना मृत पावल्या की काय? अशी परिस्थिती या बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी निवेदन देऊन आंदोलने करून सुद्धा या आदिवासींना न्याय मिळत नाही. त्यामुळे न्यायासाठी आता कुठे जावं असा संतप्त सवाल या आदिवासींकडून करण्यात येतोय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वेळोवेळी या प्रकरणी आवाज उचलला खरा मात्र त्यांनाही आता प्रशासन जुमानत नाही.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Buldhana news

    पुढील बातम्या