• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • कुटुंबातील तिघांची हत्या करुन त्याने केली आत्महत्या, हत्याकांडाने गोंदियात खळबळ

कुटुंबातील तिघांची हत्या करुन त्याने केली आत्महत्या, हत्याकांडाने गोंदियात खळबळ

कुटुंबातील तिघांची हत्या करुन त्याने केली आत्महत्या, हत्याकांडाने गोंदियात खळबळ (प्रातिनिधिक फोटो)

कुटुंबातील तिघांची हत्या करुन त्याने केली आत्महत्या, हत्याकांडाने गोंदियात खळबळ (प्रातिनिधिक फोटो)

Gondia kills 3 family members and then commits suicide: कुटुंबातील तिघांची हत्या करुन एका व्यक्तीने स्वत: आत्महत्या केल्याची घटना गोंदियात घडली आहे.

 • Share this:
  गोंदिया, 21 सप्टेंबर : विदर्भातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील (Gondia district) तिरोडा तालुक्यातील चुरडी या गावात (Churdi Village) ही घटना घडली आहे. कुटुंबातील तिघांची हत्या (3 family members killed) करुन स्वत: आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. चुरडी गावात राहणाऱ्या बिसेन कुटुंबात हे हत्याकांड घडले आहे. रेवचंद डोगरु बिसेन, मालता रेवचंद बिसेन, पूर्णिमा रेवचंद बिसेन आणि तेजस रेवचंद बिसेन अशी मृतकांची नावे आहेत. तिघांचे मृतदेह घरात आढळून आले तर एकाचा मृतदेह घरातच लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तिघांची हत्या करुन नंतर आरोपीने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त होत आहे. या गटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. हे हत्याकांड नेमकं कशामुले झालं यामागचं कारण अद्याप समजू शकलेल नाहीये. बिसेन कुटुंब सकाळी घराबाहेर दिसले नाहीत आणि घराचा दरवाचाही बंद होता. यानंतर शेजाऱ्यांनी दरवाजा घरात पाहिले असता बिसेन कुटुंबातील तिघांचे मृतदेह घरात आढळून आले तर एकाचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने संपूर्ण गोंदियात एकच खळबळ उडाली आहे. नाशकातील तरुणाचा 'Money Heist' स्टाइलने बँकेवर दरोडा  हिंगोलीत विवाहितेला भयंकर शिक्षा हिंगोली जिल्ह्यातील वसमत याठिकाणी अमानुषतेचा कळस गाठणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 23 वर्षीय विवाहितेला तिच्या पतीने आणि सासरच्या मंडळींनी एका क्षुल्लक कारणावरून नरक यातना दिल्या आहेत. आरोपींनी गॅसवर चमचा, भातवडी गरम करून पीडितेच्या गालावर आणि हाता-पायावर चटके दिले आहेत. या संतापजनक घटनेनंतर पीडितेनं वसमत शहर पोलीस ठाण्यात आरोपी पतीसह तिघांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. फरीन इरफान कुरेशी असं अत्याचार झालेल्या 23 वर्षीय फिर्यादीचं नाव आहे. तर इरफान शिकूर कुरेशी, अनीसा शिकूर कुरेशी आणि आलिया इर्शाद कुरेशी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावं आहे. पीडित विवाहितेनं कसलं तरी रेकॉर्डिंग आपल्या बहिणीला आणि वडिलांना पाठवलं होतं. याची माहिती आरोपी पतीसह सासरच्या कुटुंबाला मिळाल्यानंतर आरोपींनी पीडितेचा छळ करायला सुरुवात केली. काकाचं भूत अंगात शिरल्याचं सांगत अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाचा बलात्कार ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या अंगात काकाचे भूत शिरल्याचं सांगत एका अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाने बलात्कार केला. या संपूर्ण कृत्त्यात भोंदूबाबाला पीडित मुलीच्या आईने मदत केल्याचं समोर आलं आहे. 16 वर्षीय मुलीच्या अंगात मृत काकाचं भूत शिरल्याचं सांगत ते काढण्याच्या बहाण्याने तिच्यावर जंगलात बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत भोंदूबाबा सोबतच त्याला मदत करणाऱ्या पीडित मुलीच्या आईलाही पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी भिवंडीतील नारपोली पोलीस अधिक तपास करत आहेत.
  First published: