VIDEO : धक्कादायक! महाराष्ट्रात दुधाच्या पॅकबंद पिशवीमध्ये सापडला चक्क कोंबडीचा पीस

VIDEO : धक्कादायक! महाराष्ट्रात दुधाच्या पॅकबंद पिशवीमध्ये सापडला चक्क कोंबडीचा पीस

या घटनेची चर्चा जिल्ह्यात सर्वत्र रंगू लागली आहे.

  • Share this:

बीड, 21 डिसेंबर : दुधाच्या वाढत्या मागणीमुळे गोंधळ उडाला आणि चक्क दुधाच्या पिशवीत कोंबडीचा पीस पोहोचल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील केजमध्ये घडली आहे. या बाबत अन्न भेसळ विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून या घटनेची चर्चा जिल्ह्यात सर्वत्र रंगू लागली आहे.

केज शहरातील सादेक शेख यांनी दूध विक्री करणाऱ्या सेंटरमधून रुपमाता दूध डेअरीच्या दुधाच्या पॅकबंद पिशवीची खरेदी रविवार दिनांक 20 डिसेंबर रोजी करण्यात आली. त्यांना दुधाच्या पॅकबंद पिशवीमध्ये चक्क कोंबडीचा पीस असल्याचे आढळून आल्याने त्यांनी या बाबत रूपामाता दूध डेअरीचे मार्केटिंग मॅनेजर बिभीषण माने यांच्याकडे तक्रार केली. मात्र माने यांनी सादेक शेख यांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

रुपामाता दूध डेअरीचे मार्केटिंग मॅनेजर बिभीषण माने यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, दूध डेअरीमध्ये दुधाची पिशवी भरताना स्वच्छ्ता राखून भरण्यात येते. मात्र दूध भरण्यासाठी मागवलेल्या पोलिथीनच्या रोलला कोंबडीचा पीस चिटकून आल्याने तो दुधाच्या पिशवीमध्ये आला असावा. यापुढे सतर्क राहून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच पिशवीसाठी पोलिथीन पुरविणाऱ्या कंपनीकडे याची तक्रार केली आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, दुधाच्या पिशवीत चक्क कोंबिडीचा पीस सापडल्याने जिल्ह्यात सर्वत्र या प्रकाराची चांगलीच चर्चा रंगत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 21, 2020, 8:46 PM IST

ताज्या बातम्या