मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पावसाचं थैमान ! मुसळधार पावसात 60 जनावरे गेली वाहून, यवतमाळमधील हृदय पिळवटून टाकणारा VIDEO

पावसाचं थैमान ! मुसळधार पावसात 60 जनावरे गेली वाहून, यवतमाळमधील हृदय पिळवटून टाकणारा VIDEO

मुसळधार पावसात 60 जनावरे गेली वाहून, हृदय पिळवटून टाकणारा VIDEO

मुसळधार पावसात 60 जनावरे गेली वाहून, हृदय पिळवटून टाकणारा VIDEO

Live Video of Animals washed away in flood: मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात 60 जनावरे गेली वाहून. यवतमाळमधील घटनेचा व्हिडीओ आला समोर.

यवतमाळ, 5 ऑक्टोबर : यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यात (Mahagaon Talukha Yavatmal) काल झालेल्या जोरदार पावसामुळे (Heavy rainfall) नाल्याला आलेल्या पुरात बेलदारी (Beldari) येथील 60 ते 70 जनावरे वाहून गेली. या घटनेने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. जनावरे वाहून जात असतानाची ही घटना एका गावकऱ्याने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. हा व्हिडीओ हृदय पिळवटून टाकणारा आहे.

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल यवतमाळ जिल्ह्यातील काही भागाला पावसाने झोडपून काढले. बेलदारी येथील गाव तलाव ओव्हर फ्लो झाल्याने या तलावातून वेगाने पाणी वाहत होते. संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बेलदारी येथील गुराखी आपल्या गाई-गुरे गावाकडे घेऊन जात असताना गावा शेजारच्या नाल्याला पूर आला. गाई, गुरे, वासरे हा नाला ओलांडत असताना पुराच्या पाण्यात ते वाहून गेले.

पाण्याचा वेग एवढा होता की जनावर अक्षरशः एका मागोमाग वाहत गेली. ही घटना गावकऱ्यांना माहित होताच काही गायी, गुरांना वाचविण्यात आले. मात्र 60 ते 70 गायी, गुरे, वासरं नागरिकांच्या डोळ्या देखत वाहून गेले. या घटनेने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

पावसात ST बस पुलावरुन थेट पाण्यात कोसळली

28 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसात एसटी बस थेट पाण्यात कोसळल्याची घटना घडली. नागपूरहून नांदेडकडे जाणाऱ्या एसटीच्या हिरकणी बसला अपघात झाला. बस थेट पाण्यात कोसळली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरापासून काही अंतरावर ही दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर आली. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली.

पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा 

5 ऑक्टोबर

कोकण - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

मराठवाडा - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

6 ऑक्टोबर

कोकण - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

मराठवाडा - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

7 ऑक्टोबर

कोकण - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळख ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

मराठवाडा - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

8 ऑक्टोबर

कोकण - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळख ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

मध्य महाराष्ट्र - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकामी मुसळदार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

मराठवाडा - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज

5 ऑक्टोबर : आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारी/संध्याकाळी आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची, मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता).

6 ऑक्टोबर : आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारी/संध्याकाळी आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची, मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता).

7 ऑक्टोबर : आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारी/संध्याकाळी आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची व हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता).

8 ऑक्टोबर : आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी, संध्याकाळी आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची व हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता. (घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता).

गेल्या महिन्यात परभणीत बैलजोडी गेली वाहून

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसात परभणी येथील बैलजोडी पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. मुसळधार पावसामुळे सेलू तालुक्यातील कुपटा गावात रस्ता ओलांडणारी एक बैलजोडी पूराच्या पाण्यात वाहून गेली. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर अक्षरश: काटा येतो.

First published:
top videos

    Tags: Live video, Rain, Yavatmal