Home /News /maharashtra /

पत्नीशी संबंध असल्याचा आरोपातून केली होती मारहाण, 20 वर्षीय तरुणाच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

पत्नीशी संबंध असल्याचा आरोपातून केली होती मारहाण, 20 वर्षीय तरुणाच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

20 वर्षीय तरुणाच्या आत्महत्या प्रकरणात 29 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

    पिंपरी चिंचवड, 13 जून : पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या 20 वर्षीय तरुणाच्या आत्महत्या प्रकरणात 29 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आल्याची माहिती आहे. शरद सुभाष भोसले असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला व्यक्ती हा तरुणांसाठी एक अ‍ॅकॅडमी चालवत होता. पोलीस आणि डिफेन्ससाठी तरुणांना मार्गदर्शन करण्याचं काम या अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून करण्यात येत होतं. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. मात्र याच व्यक्तीने आत्महत्या केलेल्या तरुणाच्या मागे नोकरी टिकवण्यासाठी पैशाचा तकादा लावल्याचा आरोप मृत तरूणाच्या नातेवाईकांनी केला आहे. 'शरद भोसले याने माझ्या मुलाकडे नोकरीसाठी 5 लाख रुपयांची मागणी केली होती. तसंच यापूर्वी शरद भोसले याने त्याच्या पत्नीशी संबंध असल्याचं संशय घेत माझ्या मुलाला मारहाण केली होती,' असा आरोप आत्महत्या केलेल्या मुलाच्या वडिलांनी दिलेल्या पोलीस तक्रारीत करण्यात आला आहे. याबाबत हिंदुस्तान टाइम्सने वृत्त दिलं आहे. हेही वाचा - पुण्यात धक्कादायक घटना, येरवडा जेलच्या क्वारन्टाइन सेंटरमधून 2 आरोपी पळाले दरम्यान, “आम्ही अ‍ॅकॅडमीची क्रेडेन्शियल्स तपासत आहोत. हा गुन्हा सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आला आहे,” अशी माहिती चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र जाधव यांनी दिली आहे. तसंच याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या