मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नाशिक-पुणे महामार्गाबद्दल धक्कादायक माहिती, तब्बल 2700 झाडांची झाली कत्तल!

नाशिक-पुणे महामार्गाबद्दल धक्कादायक माहिती, तब्बल 2700 झाडांची झाली कत्तल!

 दुतर्फा 36,600 एवढी झाडे लावल्याचे सांगण्यात आलेलं असताना आज एकही झाड अस्तित्वात दिसत नाही.

दुतर्फा 36,600 एवढी झाडे लावल्याचे सांगण्यात आलेलं असताना आज एकही झाड अस्तित्वात दिसत नाही.

दुतर्फा 36,600 एवढी झाडे लावल्याचे सांगण्यात आलेलं असताना आज एकही झाड अस्तित्वात दिसत नाही.

नाशिक, 06 सप्टेंबर : महामार्ग चौपदरीकरण करताना नाशिक-पुणे महामार्गावरील जवळपास 2700 हुन अधिक वृक्ष तोडले गेले असल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे.  प्रत्येक झाडामागे 10 वृक्ष लावण्याची अट टाकण्यात आली होती. मात्र, ठेकेदाराने या अटींचे पालन  न करता दिशाभूल केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी केला आहे.

या प्रकरणी गणेश बोऱ्हाडे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली असून याबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता राष्ट्रीय हरित लवादाने वनविभागासह सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटिसा बजावल्या आहेत.

पुणे-नाशिक महामार्गावरून प्रवास करताना आता आपल्याला छान वाटत असेलही. मात्र, हा रस्ता बनवताना शेकडो वर्षापूर्वीच्या हजारो झाडांचा बळी गेला. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात कऱ्हे घाट ते बोटा खिंड या 44 किमी अंतरात विविध प्रकारची 2373 झाडे तोडण्यात आली होती. त्या प्रत्येक झाडामागे 10 झाडे लावण्याची अट ठेकेदाराला घालण्यात आली होती.

मात्र, रस्त्याच्या मध्यभागी 7480 एवढी केवळ झुडूपे लावण्यात आली आहे. तर दुतर्फा 36,600 एवढी झाडे लावल्याचे सांगण्यात आलेलं असताना आज एकही झाड अस्तित्वात दिसत नाही.

गेल्या 6 वर्षात कोणतीचं झाडे लावली नसल्याचे एकप्रकारे सिद्ध झाले आहे. तोडलेल्या प्रत्येक झाडांसाठी 10 झाडे लावले आहेत की नाही? याची सखोल चौकशी करण्याचा आदेश हरीत लवादाने दिला असून समितीने सहा आठवड्यात हा अहवाल सादर करायचा आहे.

First published:

Tags: Pune highway