धक्कादायक! इंदापूरच्या सुपुत्राचा आसाममध्ये मृत्यू; लष्कराच्या गाडीचा भीषण अपघात

धक्कादायक! इंदापूरच्या सुपुत्राचा आसाममध्ये मृत्यू; लष्कराच्या गाडीचा भीषण अपघात

या घटनेची माहिती मिळताच इंदापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे

  • Share this:

इंदापूर, 24 फेब्रुवारी : इंदापूर तालुक्यातील मौजे बोराटवाडी गावचे लक्ष्मण सतू डोईफोडे ( वय 45 वर्षे ) यांचा एका भीषण अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लक्ष्मण डोईफोडो हे आसाम येथे कर्तव्यावर असताना 23 फेब्रुवारी रोजी शहीद झाले आहेत. सुभेदार लक्ष्मण डोईफोडे हे सैन्यदलात सिग्नल रेजिमेंट आसाम या ठिकाणी सुभेदार म्हणून कार्यरत होते. गस्त घालत असताना भारतीय जवानांची गाडी दरीत कोसळली, यामध्ये त्यांना वीरमरण आले आहे. लक्ष्मण डोईफोडे यांच्या निधनाची माहिती कळताच बोराटवाडी गावासह इंदापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. (Shocking indapurs son dies in Assam Terrible accident of an army vehicle )

हे ही वाचा-माजी अर्थमंत्र्यांच्या बहीण-भाऊजीच्या गाडीला भीषण अपघात; दोघांचाही मृत्यू

वीरमरण आलेले लक्ष्मण डोईफोडे यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. (Shocking indapurs son dies in Assam Terrible accident of an army vehicle ) डोईफोडे परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. बोराटवाडी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ डोईफोडे परिवाराच्या दुःखात सामील असून या घटनेने संपूर्ण इंदापूर तालुक्यातील तरुण, नागरिक, मित्र परिवारातून मधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: February 24, 2021, 10:50 PM IST
Tags: assam

ताज्या बातम्या