Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सुंदर दिसण्यासाठी अन् स्पर्धेत जिंकण्यासाठी अघोरी प्रकार; श्वानाचे कापले कान, सांगलीतील धक्कादायक घटना

सुंदर दिसण्यासाठी अन् स्पर्धेत जिंकण्यासाठी अघोरी प्रकार; श्वानाचे कापले कान, सांगलीतील धक्कादायक घटना

Sangli doctor cuts ears of dog: डॉबरमॅन जातीच्या श्वानाचे कान कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Sangli doctor cuts ears of dog: डॉबरमॅन जातीच्या श्वानाचे कान कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Sangli doctor cuts ears of dog: डॉबरमॅन जातीच्या श्वानाचे कान कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

सांगली, 2 ऑक्टोबर : डॉबरमॅन (Doberman Dog) जातीच्या एका श्वानाचे एका डॉक्टरने मुळापासून कान कापल्याचा (Doctor cut ears of dog) धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी सांगलीतील डॉक्टरवर संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. ॲनिमल राहत (Animal Rahat) या संस्थेच्या वतीने हा गुन्हा दाखल करण्यात आला आले. सुंदर दिसण्याबरोबर स्पर्धेत नंबर मिळवण्यासाठी हा अघोरी प्रकार करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

सांगलीतील संजय नगर येथील रजपूत कॉलनी येथे राहणारया एका डॉक्टरने स्वतःच्या कुत्र्यावर अघोरी प्रकार केल्याचं समोर आलं आहे. तीन महिन्यांच्या डॉबरमॅन जातीच्या श्वानाचे दोन्ही कान मुळातून कापण्यात आले आहेत. डॉक्टर सुनील कोल्हे (Dr Sunil Kolhe) असे या डॉक्टरचे नाव आहे. कोल्हे हे माणसांचे डॉक्टर आहेत. मात्र त्यांनी आपल्या श्वानावर हा अघोरी प्रकार केला आहे.

याबाबत प्राणीमित्र संघटना राहत फॉर ॲनिमल संस्थेने याची संपूर्ण माहिती घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत संजय नगर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत डॉक्टर सुनील कोल्हे यांच्या विरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 - कलम 11,38, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951- कलम 119, श्वान प्रजनन आणि विपणन नियम, 2017 आणि भारतीय दंड संहिता 1860- कलम 429 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. वाय. क्षीरसागर यांनी दिली आहे.

डॉबरमॅन आणि काही जातीच्या श्वानांचे प्रामुख्याने कान आणि शेपूट कापण्यात येतात. सुंदर दिसण्या बरोबर स्पर्धेमध्ये ज्यांना बक्षीस मिळावा यासाठी प्रामुख्याने अशा प्रकारचे अघोरी उपचार केले जातात. मात्र नैसर्गिक अवयव गमवावे लागल्याने त्या श्वानांना पुढील काळात वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे. अशा प्रकारच्या घटना या सर्वत्र घडतात, त्यामुळे याच्या बाबतीत विशेष कायदाही करण्यात आला आहे. मात्र तरीही बेकायदेशीररित्या कान आणि शेपूट कापण्याचे घटना घडत आहेत. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणखी कडक पावले उचलण्याची गरज असल्याचे मत ॲनिमल फॉर राहत संस्थेचे सदस्य कौस्तुभ पोळ यांनी व्यक्त केले आहे.

पुण्यात श्वानाच्या मालकीणीला बेदम मारहाण

आईच्या अंगावर कुत्रा भुंकल्यानं चार जणांनी पुण्यातील एका तरुणीला बेदम मारहाण केल्याची घटना तीन महिन्यांपूर्वी पुण्यात घडली होती. या प्रकऱणी न्यायालयाच्या आदेशानंतर कोथरूड पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. राजाराम मारुती चौधरी, त्यांची आई मालुबाई चौधरी, पत्नी बायडा राजाराम चौधरी आणि मंदाकिनी चौधरी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं असून सर्वजण कोथरुड परिसरातील म्हातोबानगर परिसरातील रहिवासी आहेत. याप्रकरणी निशा पंडित थरकुडे (वय-40) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.

First published:

Tags: Crime, Sangli