मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /...समुद्राजवळील तो सेल्फी ठरला शेवटचा; एकाच कुटुंबातील 2 महिलांचा करूण अंत

...समुद्राजवळील तो सेल्फी ठरला शेवटचा; एकाच कुटुंबातील 2 महिलांचा करूण अंत

या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वैतरणा, 15 ऑक्टोबर : वैतरणा खाडी जवळील जेट्टीवर सेल्फी काढण्याच्या नादात एकाच घरातील ४ महिला समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यातील दोघींना सुखरूप वाचविण्यात स्थानिकांना यश आले असून दोघींचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. वैतरणा पूर्व फणस पाडा गाव येथे जेट्टीवर सेल्फी फोटो घेत असताना धक्क्यावर मळी चिखलाच्या पाण्यात दोघी घसरून पडल्या.

दोघीजणी थेट समुद्रातच पडल्या. दरम्यान दोघीजणी त्यांना वाचवायला गेल्या होत्या. सुदैवाने त्या दोघी वाचल्या आहेत. गावकऱ्यांच्या मदतीने समुद्रातील महिलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र त्याठिकाणी कोणतीही सुविधा नसल्याने त्यांना बाहेर काढण्यात उशीर झाल्यामुळे लीला धमसिंग दासना वय 24 वर्ष व सत्तू घासी दासाना १४ यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून एकाच घरातील दोघी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

रात्री बाईकवरुन कामावर निघाला अन् सकाळी मृतदेह परतला घरी

सत्तू हिचा मृतदेह स्थानिकांनी बाहेर काढला असून लीला यांचा मृतदेह वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून बचावलेल्या दोघी घरी निघून गेल्याने त्यांची नावे समजू शकली नसल्याचे अग्निशमनदलाचे प्रमुख दिलीप पालव यांनी सांगितले.

First published:

Tags: Crime news