मनमाडमध्ये धक्कादायक घटना, एकाच दिवशी इंडियन ऑयलच्या 2 अधिकाऱ्यांचा मृत्यू

मनमाडमध्ये धक्कादायक घटना, एकाच दिवशी इंडियन ऑयलच्या 2 अधिकाऱ्यांचा मृत्यू

मनमाडमधील इंडियन ऑयल कंपनीत काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

  • Share this:

मनमाड, 17 जून : मनमाडमधील इंडियन ऑयल कंपनीत काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. आज सकाळी एका अधिकाऱ्याचा कंपनीच्या निवासात मृतदेह आढळून आला तर आणखी एका अधिकाऱ्याचा ह्रदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.

मनमाडमधील धोटाणे परिसरात इंडियन ऑयल कंपनी गॅस प्रकल्पात काम करणाऱ्या बी.एस.पवार (वय 56) या अधिकाऱ्याचा आज सकाळी मृत्यू झाला. पवार हे आपल्या कुटुंबीयाला भेटायला नाशिकला गेले होते. घरी पोहोचल्यानंतर त्यांनी गाडी पार्किंगमध्ये लावली आणि घरात प्रवेश केला असता अचानक त्यांना ह्रदयविकाराचा धक्का बसला त्यामुळे ते खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले.   पवार यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

सोने विकत घेणार आहात? खरेदीबाबतच्या या नियमात होऊ शकतो मोठा बदल

बी.एस.पवार हे  धोटाणे परिसरात  असलेल्या गॅस प्रकल्पात सिनियर मॅनेजर पदावर कार्यरत होते.

क्वारंटाइन असलेल्या अधिकाऱ्याचा आढळला मृतदेह

तर दुसऱ्या घटनेत इंडियन ऑयल कंपनीच्या  निवासस्थानात  जालिंदर कालेकर या अधिकाऱ्याचा आज सकाळी मृतदेह आढळून आल्यामुळे  खळबळ उडाली. जालिंदर कालेकर (वय 58) हे इंडियन ऑईल कॉप्रोरेशनच्या पानेवाडी प्रकल्पात टर्मिनल मॅनेजर पदावर कार्यरत होते. जालिंदर कालेकर हे गेली काही दिवस सुट्टीवर होते. सुट्टीवर असताना ते आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मुंबईला गेले होते. कालेकर हे मुळचे पुण्याचे रहिवासी होते. त्यांचे कुटुंब हे सध्या मुंबईत राहत आहे.  मुंबईतून ते 11 जून रोजी मनमाडमध्ये परतले होते.   त्यामुळे जालिंदर कालेकर यांना होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.

झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी उच्चशिक्षित तरुणांनी धरला 'हा' मार्ग, पण...

त्यानुसार, ते इंडियन ऑयल कंपनीच्या अधिकारी निवासात 11 जूनपासून एकटेच राहत होते. परंतु, आज सकाळी त्यांचा  मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कालेकर यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी  मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.  कालेकर यांचा मृत्यू कशामुळे झाला याचा पोलीस तपास करत आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: June 17, 2020, 2:07 PM IST

ताज्या बातम्या