कल्याण, 27 नोव्हेंबर : एका दाम्पत्याने आपल्या पाच दिवसाच्या नवजात बाळाची डोंबिवलीतील एका डॉक्टरला एक लाखात बेकायदेशीर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस (Dombivli Ramnagar Police) ठाण्यात डॉक्टर केतन सोनी (Dr Ketan Soni booked) आणि दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.आता या डॉक्टरचा मोठा प्रताप समोर आला आहे.
बेकायदेशीर बालक आश्रम
15 नोव्हेंबरला एका दाम्पत्याने आपल्या पाच दिवसाच्या बाळाची विक्री केल्यानंतर ते बाळा परत मागण्यासाठी आई दोन दिवसांनी डॉक्टर सोनी यांच्याकडे आली. मात्र डॉक्टरने बाळ देण्यास नकार दिला. त्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी महिला बालविकास, बाल संरक्षण विभागाला याची माहिती मिळताच त्यांनी डॉक्टर सोनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पुढे तपासादरम्यान डॉ. केतन सोनी हा कल्याणमध्ये नंददीप या नावाने बेकायदेशीर बालक आश्रम (illegal orphanage in Kalyan) चालवत असल्याचे माहिती ठाणे जिल्हा महिला आणि बालविकास विभाग आणि पोलिसाना मिळाली.
डांबून ठेवलेल्या 71 मुलांची सुटका
या माहितीच्या आधारे या बालक आश्रमात धाड टाकली असता 71 बालकांची सुटका करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे या संस्थेपासून काही अंतरावर जुन्या इमारतीत 2 ते 13 वर्ष वयोगटातील तब्बल 38 मुलांना एका खोलीत कोंडून ठेवले होते. त्यांच्या आरोग्याची कोणतीही काळजी त्यांनी घेतली नव्हती, सर्व मुलं आजारी होती अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी पल्लवी जाधव यांनी दिली.आता तब्बल 71 मुलांची सुटका करून त्यांना शासकीय बाल सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
वाचा : पिंपरीतील पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचं गूढ उकललं, हल्ल्यामागचं नेमकं कारण आलं समोर
डॉ केतन सोनी हे कल्याणात नंददीप बालकाश्रम चालवीत असल्याची माहिती मिळाल्यांनतर बालसंरक्षण अधिकाऱ्यांच्या टीमकडून संस्थेत पाहणी केल्यानंतर 29 मुले हजर असल्याचे दिसून आले. संस्थेची तपासणी केल्यानंतर लहान मोठया मुलींचे कपडे वाळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अधिका-यांनी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनी मुली संस्थेत राहत नाहीत असे उत्तर दिले. बालकल्याण समितीला संशय आल्याने त्यांनी या बाबत बाजारपेठ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर बाजारपेठ पोलीसांच्या पथकासह संस्थेच्या अधिकाऱ्यांनी संस्थेच्या खोल्यांची तपासणी केली.
संस्थेच्या कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी केल्यानंतर संस्थेच्या बिल्डींगपासून काही अंतररावर एका जुन्या इमारतीत मुले असल्याची कबुली दिली. आणखी सखोल चौकशी केली असता ताब्यात घेतलेल्या ७१ मुलांची संबंधी कोणतीच माहिती,कागद पत्र किंवा त्याची साधी नोंद देखील नाही.त्यामुळे ही मुलं कुठून आणली,कशी आणली गेली याचा तपास करणं महत्वाचे आहे.आता या प्रकरणी महिला आणि बाल विकास बलविभागाने कल्याण बाजारपेठ पोलिस ठाण्यात डॉ.केतन सोनी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.