Home /News /maharashtra /

तिसऱ्या पत्नीसोबत राहणाऱ्या बापाने आवळला पोटच्या मुलाचा गळा, कारण ऐकून सरकेल पायाखालची जमीन

तिसऱ्या पत्नीसोबत राहणाऱ्या बापाने आवळला पोटच्या मुलाचा गळा, कारण ऐकून सरकेल पायाखालची जमीन

Father killed son: जमिनीसाठी वडिलांनीच आपल्या मुलाचा गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बीड, 16 सप्टेंबर : पहिल्या पत्नीच्या मुलाच्या नावाने जमीन (Piece of land) करावी लागेल म्हणून जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 13 वर्षीय मुलाचा वडिलांनी गळा दाबून हत्या (Father killed son) केल्याची घटना बीड तालुक्यातील खडकी घाट गावात (Khadaki Village Beed) उघडकीस आली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून पोटच्या मुलाचा गळा घोटणाऱ्या नराधम बापाला पोलिसांनी काही तासांत अटक केली. राकेश उमेश वाघमारे असं मयत मुलाचं नाव आहे. तर आरोपी उमेश वाघमारे याच्या पोलिसांनी मुसक्या आवळ्या आहेत. बीड तालुक्यातील खडकी घाट येथील खोखडोह वस्तीवरील शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये 13 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आपल्या मुलाचा खून केलेल्या बापाला पकडले. उमेश वाघामारे असे त्या आरोपीचे नाव असून त्याने तीन विवाह केले आहेत. पहिली सोडून गेली दुसरीने आत्महत्या केली आणि तिसरीसोबत तो बीडमध्ये राहत होता. बापरे! तरुणाने सासरच्या मंडळींसमोर स्वत:ला पेटवून घेतलं; घटनेचा भयावह VIDEO आला समोर पहिल्या पत्नीचा मुलगा राकेश हा आज्जी-आजोबांसोबत खडकी घाट येथे राहत होता. राकेश हा पहिल्या पत्नीचा मुलगा असल्याने वडिलोपार्जित सहा एकर जमीनपैकी काही जमीन राकेशच्या नावावर ती करावी लागेल म्हणून वाद सुरु होता. या वादातून रात्री राकेशला वस्तीवरील शेडमध्ये नेऊन त्याचा खून करून नराधम उमेश पहाटेस गाव सोडून निघून गेला. सकाळी पत्र्याच्या शेडमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. राकेशचा घातपात आहे हे प्रथमदर्शनी पोलीस तपासातून समोर आले. त्यावेळी आजोबांनी दिलेल्या माहिती वरून उमेश पहाटेच गाव सोडून गेल्याची खबर मिळाल्यानंतर नेकनूर पोलिसांनी तपसाची चक्रे फिरवत आरोपीला पाटोदा येथील पोलिसांच्या मदतीने पकडत बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने खळबळ उडाली असून जन्मदात्या पित्यानेच प्रॉपर्टीच्या वादावरून मुलाचा गळा घोटाळ्याने संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास नेकनूर पोलीस स्टेशन करत आहेत.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Beed, Crime

पुढील बातम्या