धक्कादायक! कोरोनाच्या तब्बल 6 प्रकरणांत चुकीचा अहवाल, ठाण्यात 'या' लॅबवर घातली बंदी

धक्कादायक! कोरोनाच्या तब्बल 6 प्रकरणांत चुकीचा अहवाल, ठाण्यात 'या' लॅबवर घातली बंदी

ठाणे शहरात कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांची तपासणी शासनमान्य प्रयोगशाळेकडेच करण्यात येते.

  • Share this:

ठाणे, 22 मे : थायोरोकेअर या आयसीएमआरच्या अधिकृत प्रयोगशाळेत कोव्हिड 19 च्या स्वॅब तपासणीत 6 प्रकरणात चुकीचा अहवाल आढळल्याने या लॅबला ठाण्यात कोव्हिड 19 चे स्वॅब तपासणी करण्यास बंदी घालण्याचा आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिला आहे. ठाणे शहरात कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांची तपासणी शासनमान्य प्रयोगशाळेकडेच करण्यात येते.

थायोरोकेअर लॅब आयसीएमआरच्या अधिकृत प्रयोगशाळेच्या यादीमध्ये घोषित करण्यात आली होती. परंतु ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सदर प्रयोगशाळेने दिलेल्या 6 प्रकरणांमध्येचु कीचा अहवाल असल्याचे आढळून आले. यामुळे अनेक रूग्णांना सामाजिक आणि मानसिकत्रासातून जावे लागले होते. त्यामुळे 22 मे 2020 पासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील संशयितांसाठी या लॅबने कोव्हिड -19 स्वॅबगोळा करू नये, असे आदेश ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. कोव्हिड चाचणी बाबत असमाधानकारक सुविधा दिल्यामुळे महापालिकेच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, आज ठाणे महापालिका क्षेत्रात 198 कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या एकूण 1758 झाली आहे.

मुंबईत काय आहे स्थिती?

मुंबईत रुग्णवाढीचे दररोज नवे उच्चांक समोर येत आहेत. आज एका दिवसातली सर्वाधिक रुग्णवाढ मुंबईत पुन्हा दिसून आली. 1751 रुग्ण गेल्या 24 तासांत मुंबईत आढळले. शहरात कोरोनाव्हायरसमुळे 27 मृत्यू नोंदले गेले. मुंबईत कोरोनाव्हायरसचा धोका उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणात पसरत आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 22, 2020, 11:14 PM IST

ताज्या बातम्या