ठाणे, 13 एप्रिल : राज्यातील कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा 2334 पर्यंत पोहोचला असून 24 तासांत 11 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान ठाण्यातही कोरोना (Covid - 19) बाधितांची संख्या वाढत आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 1 पीसीआय आणि 2 कॉन्स्टेबलचा समावेश आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची संख्या नियंत्रणात राहण्यासाठी हे तीनही पोलीस मुंब्रा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी पोलीस रात्र-दिवस तैनात आहेत. मात्रआता कोरोना वॉरिअर्सना कोरोनाची लागण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
राज्यात आज वाढ झालेल्या 352 रुग्णांपैकी 242 रुग्ण हे मुंबईतील आहेत. पुण्यातही गेल्या 24 तासांत 39 रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोना रूग्णांची संख्या कालपर्यंत 1982 इतकी होती ती आज 352 ने वाढून 2334 पर्यंत पोहोचली आहे.
मुंबई - 242
मालेगाव -14
औरंगाबाद -4
पुणे - 39
पिपंरी चिंचवड -6
नागपूर - 11
ठाणे - 9
वसई विरार - 5
देशाची आकडेवारी पाहिली तर गेल्या 24 तासांमध्ये 51 जणांचा मृत्यू झाला. ही आत्तापर्यंतची सर्वात जास्त संख्या आहे. तर कोरोना रुग्णांची सख्या 9352 वर पोहोचली आहे तर मृत्यूची संख्या 324 वर गेली आहे. 8048 रुग्ण उपचार घेत असून 979 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यात 72 विदेशी नागरिकांचा समावेश आहे.
संबंधित -
धक्कादायक! मुंबईतील 7 पत्रकार कोरोना पॉझिटिव्हमुंबईत कोरोनाबळी 100; बाधितांचा आकडा गेला 1549 वरकोरोनाचा उद्रेक : 24 तासांमध्ये 51 मृत्यू, आत्तापर्यंतची सर्वाधिक संख्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.