धक्कादायक! कोरोना रुग्णांची मृत्यूनंतरही अवहेलना, नातेवाईकांना करावं लागतंय 'हे' काम!

धक्कादायक! कोरोना रुग्णांची मृत्यूनंतरही अवहेलना, नातेवाईकांना करावं लागतंय 'हे' काम!

नाशिक महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.

  • Share this:

नाशिक, 4 सप्टेंबर: नाशिक महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. कोरोना रुग्णांची मृत्यूनंतरही अवहेलना होत असल्याची चित्र समोर आलं आहे. कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाल्यानंतर मृतदेह हलवण्यासाठी कर्मचारीच नाहीत. परिणामी PPE किट घालून नातेवाईकांनाच रुग्णालयातून मृतदेह उचलून अंत्यसंस्कारासाठी नेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महापालिका रुग्णालयात स्टाफ खरोखर नाही की अनास्था?असा सवाल उपस्थि होत आहे.

हेही वाचा...पुण्यात कोरोनाबाबत स्थिती का बिघडतेय? काय चुकतंय? शरद पवारांनी घेतली शाळा!

व्हेंटिलेटर पडले धूळखात...

नाशिकला पीएम केअर फंडातून मिळालेले 10 व्हेंटिलेटर महापालिका रुग्णालयात अक्षरश: धूळखात पडले आहेत. ज्या प्रेशरने ऑक्सिजन पुरवठा झाला पाहिजे, तशी टाकी उपलब्ध नसल्यानं व्हेटिलेटरचा वापर झालेला नाही, असं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

नाशिक शहरातील झाकिर हुसैन आणी कोविड स्पेशल मराठा विद्याप्रसारक हॉस्पिटलमध्ये गेल्या दीड महिन्यापासून 10 व्हेंटिलेटर्स आले आहेत. मात्र, त्यांची अद्याप जोडणी झाली नसल्याचा अजब खुलासा टेक्निशियननं केला आहे. त्यामुळे ते धूळखात पडून आहेत.

वॉर्डबॉयच्या भरवशावर रुग्णालय...

झाकिर हुसैन आणी कोविड स्पेशल मराठा विद्याप्रसारक हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. एका वॉर्डबॉयच्या भरवशावर रुग्णालय सुरू असल्याचा आरोप मृत कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

रुग्णसंख्या 40 हजार तर 900 मृत्यू..

राज्यासह नाशिकमध्ये करोनाची चढती कमान असून, रुग्णांच्या वाढीसह मृत्यूही सातत्याने होत आहेत. आरोग्य विभागासाठी ही धोक्याची घंटा ठरू लागली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने 40 हजारांचा टप्पा पार केला आहे. तर मृतांचा आकडा 900 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 32 हजार 236 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

हेही वाचा...जालन्यात भरदिवसा थरार, हाणामारीत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू तर तिसरा गंभीर

विशेषत: शहरात दररोज आठशेहून अधिक रुग्ण समोर येत आहेत. सुदैवाची बाब म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. कोरोनाची मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेल्या मालेगावमध्ये तूर्तास मृत्यू आणि रुग्णसंख्या आटोक्यात आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 4, 2020, 2:48 PM IST

ताज्या बातम्या