धक्कादायक! भाजप खासदाराला एकाच महिन्यात दुसऱ्यांदा झाली कोरोनाची लागण
धक्कादायक! भाजप खासदाराला एकाच महिन्यात दुसऱ्यांदा झाली कोरोनाची लागण
कोरोना हा आजार खोटा असल्याचे सांगणारा तरुण फिटनेस इफ्लूएसर रुपात चर्चित होता आणि फिटनेससे संबंधित व्हिडीओ शेअर करत होता. नुकताच तो तुर्कस्तानच्या ट्रिपला गेला होता.
कोरोनाची दुसऱ्यांदा लागण होत असल्यानं लोकप्रतिनिधींमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
मुजीब शेख,नांदेड, 14 सप्टेंबर : नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना एका महिन्यातच दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ऑगस्ट महिन्यात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली होता. उपचारानंतर कोरोनावर मात करण्यात ते यशस्वी झाले. मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
पहिल्यांदा कोरोनाची लागण झाल्यानंतर चिखलीकर यांनी औरंगाबाद येथे उपचार घेतले होते. नंतर ते नांदेडला आले. आता पुन्हा त्यांना कोरोनाची लागण झाली. संसदेच्या अधिवेशनापूर्वी नांदेडमध्ये 7 तारखेला पुन्हा त्यांची चाचनी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली होती. त्यानंतर ते दिल्लीला गेले. अधिवेशनापूर्वी पुन्हा त्याची चाचणी झाली आणि त्यामध्ये ते पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
सध्याखासदार चिखलीकर यांची प्रकृती उत्तम असून आता ते दिल्ली येथील निवासस्थानी आहेत. त्याच ठिकाणी ते उपचार घेणार आहेत. पण कोरोनाची दुसऱ्यांदा लागण होत असल्यानं लोकप्रतिनिधींमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
शिवसेनेच्या 4 खासदारांनीही झाली लागण
महाराष्ट्रातील अन्य चार खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. लोकसभेतील हे चारही खासदार शिवसेनेतील आहेत. लोकसभा सचिवालय यांच्या वतीने करण्यात आलेल्या कोरोना चाचणीमध्ये या खासदारांची चाचणी सकारात्मक असल्याची माहिती आहे. यामध्ये प्रतापराव जाधव, हेमंत गोडसे, विनायक राऊत आणि सदाशिव लोखंडे यांचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.