धक्कादायक! गावठी बंदुकीने गोळी झाडून काळवीटची हत्या, नाशिक जिल्ह्यातील घटना

धक्कादायक! गावठी बंदुकीने गोळी झाडून काळवीटची हत्या, नाशिक जिल्ह्यातील घटना

आरोपींकडून एक गावठी बंदूक, 5 जिवंत काडतुसे, काळवीटचे मांस व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

  • Share this:

मनमाड, 11 ऑक्टोबर : गावठी बंदुकीने गोळी झाडून काळवीटची शिकार केल्याची धक्कादायक घटना नांदगाव तालुक्यातील जामधरी येथे घडली. या घटनेमुळे पशु-पक्षी प्रेमीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून 2 आरोपींना पकडले. तसंच त्यांच्याकडून एक गावठी बंदूक, 5 जिवंत काडतुसे, काळवीटचे मांस व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना 15 दिवसाची वन विभाग कोठडी देण्यात आल्याची माहिती वन विभागाचे निरीक्षक दत्तात्रय बोरसे यांनी दिली.

नेमकं काय घडलं?

नांदगाव तालुक्यात वन विभागाचे शेकडो हेक्टर वन जंगल असून त्यात हरीण, काळवीट, ससे, मोर यासह इतर अनेक वन्य प्राणी असल्याने अनेक वेळा शिकारी लपून छपून येवून वन्य प्राण्यांची शिकार करतात. असाच काहीसा प्रकार जामधरी भागात शुक्रवारी रात्री घडला. दोन शिकाऱ्यांनी गावठी बंदुकीची गोळी झाडून एका काळविटाची शिकार करून तिची हत्त्या केली.

काळवीटची शिकार करण्यात आल्याची माहिती मिळताच वन विभागाचे निरीक्षक दत्तात्रय बोरसे,वनपाल तानाजी भुजबळ,कुणाल वंडगे,ए.बी.राठोड,प्रफुल पाटील,अजय वाघ,बाबसाहेब सूर्यवंशी,नाना राठोड,अशोक सोनवणे,राजेंद्र दौड,मार्गेपाड आदींनी घटनास्थळी धाव घेवून 2 आरोपींना रंगेहाथ पकडले.

मुद्स्सर अहेमद आणि जाहिद अहेमद (दोघे रा.मालेगाव) अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून एक गावठी बंदूक,पांच जिवंत काडतुसे,काळवीटचं मांस आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. दोघा आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांना 15 दिवसाची कोठडी देण्यात आली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 11, 2020, 8:25 PM IST

ताज्या बातम्या