धक्कादायक! बाळाला जन्म दिल्यानंतर महिला निघाली कोरोना पॉझिटिव्ह, डॉक्टरांसह 47 जण क्वारन्टाइन

धक्कादायक! बाळाला जन्म दिल्यानंतर महिला निघाली कोरोना पॉझिटिव्ह, डॉक्टरांसह 47 जण क्वारन्टाइन

ळाला जन्म दिल्यानंतर ही महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • Share this:

पंढरपूर, 27 एप्रिल : कोरोनाच्या संकटकाळात गरोदर महिलांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मोहोळ तालुक्यातील महिलेची पंढरपुर येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रसुती झाली. मात्र बाळाला जन्म दिल्यानंतर ही महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हॉस्पिटलमध्येच ही महिला कोरोनाग्रस्त असल्याचं आढळून आल्याने पंढरपूकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या 10 डॉक्टरांसह तब्बल 47 जणांना क्वारन्टाइन करण्यात आलं आहे. तसंच या महिलेच्या बाळाचेही स्वॅब घेण्यात येणार आहेत. या बाळाचा अहवाल निगेटिव्ह यावा, यासाठी आता सर्वजण प्रार्थना करत आहेत.

सोलापूरमध्ये 4 डॉक्टरांना झाली आहे कोरोनाची लागण

सोलापूर जिल्ह्यात आणखी एका प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणारे 1 डॉक्टरही पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे सोलापुरात 4 डॉक्टर आणि एक नर्स पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं आहे. सोलापूर जिल्ह्यात काल 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली.

हेही वाचा - पुण्यातील कोरोनाचं मूळ नष्ट करण्यासाठी मोठं पाऊल, हॉटस्पॉट असलेल्या भागासाठी ही नवी मोहिम सुरू

यामध्ये सोलापूर शहरातील 10 तर मोहोळ तालुक्यातील पेनूरमधील 1 रुग्णाचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे सोलापुरातील 11 पैकी 4 रुग्ण खासगी डॉक्टर तर 1 नर्सचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 61 एवढी झाली आहे.

First published: April 27, 2020, 4:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading