• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • हृदयद्रावक ! दिवाळीसाठी कपडे खरेदीसाठी गेलेल्या व्यापाऱ्याचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन, घटनेचा CCTV 

हृदयद्रावक ! दिवाळीसाठी कपडे खरेदीसाठी गेलेल्या व्यापाऱ्याचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन, घटनेचा CCTV 

दिवाळीसाठी कपडे खरेदीसाठी गेला अन् उभ्या उभ्या कोसळला, घटनास्थळीच मृत्यू, घटनेचा CCTV

दिवाळीसाठी कपडे खरेदीसाठी गेला अन् उभ्या उभ्या कोसळला, घटनास्थळीच मृत्यू, घटनेचा CCTV

Man died due to heart attack during diwali shopping, caught in cctv: शॉपिंगसाठी गेलेल्या इसमाचा दुकानात कोसळून मृत्यू, घटनेचा व्हिडीओ आला समोर.

 • Share this:
  राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलढाणा, 7 नोव्हेंबर : दिवाळी (Diwali) सणानिमित्त कपडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्याचा दुकानातच कोसळून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पळसोडा येथील स्वस्त धान्य दुकानदार विलास मोरे (Vilas More) हे आसलगाव येथे कपडे खरेदीसाठी हरी ओम ड्रेसेसमध्ये आले होते. कपडे घेत असताना अचानक खाली कोसळले त्यात त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. (Man died on the spot after fall down in shop due to heart attack incident caught in CCTV) ही संपूर्ण घटना त्या कपड्याच्या दुकानात लागलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियातही जोरदार व्हायरल होत आहे. ऐन दिवाळीच्या सणामध्ये घडलेल्या या घटनेमुळे मोरे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. तीन बहिणी असलेल्या शिवमची भाऊबीजेच्या दिवशी निर्घृण हत्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना शनिवारी समोर आली. मनमाड रेल्वे स्थानकात (Manmad Railway Station) ही घटना घडली आहे. रेल्वे स्थानकातील प्रवाशांसमोर ही हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली. हत्या झालेल्या युवकाचे नाव शिवम पवार (Shivam Pawar) असे असून त्याला तीन बहिणी आहेत. भाऊबीजेच्या (Bhai dooj) दिवशीच असं घडल्याने संपूर्ण पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. रेल्वे स्थानकावर नंदीग्राम एक्स्प्रेस उभी होती त्यावेळी 4 ते 5 तरुणांनी शिवम याच्यावर धारदार शस्त्राने 5 ते 6 वार केले. या हल्ल्यात शिवम गंभीर जखमी झाला, त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. हल्ला केल्यानंतर मारेकरी नंदीग्राम एक्स्प्रेसने मुंबईकडे फरार झाले. भाऊबीज करुन परतताना काळाचा घाला; भाऊ-बहिणीने जागीच सोडला जीव भाऊबीजेच्या दिवशी झालेल्या भीषण अपघातात बहीण-भाऊ ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मोठ्या बहिणीच्या घरी भाऊबीज आटपून घरी परतणाऱ्या लहान बहीण-भावाचा जत तालुक्यातल्या दरिकोनुर या ठिकाणी क्रुझर गाडीला जोरदार धडक दिल्याने दुर्देवी अपघात झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जत तालुक्यातल्या दरीबडच्या नजीक असणाऱ्या दरिकोनुर या ठिकाणी क्रुझर आणि दुचाकी गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये भाऊ आणि बहीण दोघे जण ठार झाले आहेत. भाऊबीजेच्या दिवशी बहीण-भावांचा हा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अक्षय श्रीमंत चौगुले, वय 20 आणि त्याची बहीण काजल श्रीमंत चौगुले, वय 16 असे ठार झालेल्या बहिण-भावांची नावे आहेत.
  Published by:Sunil Desale
  First published: