मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

डोंबिवलीनंतर कल्याण हादरले ! शिक्षकाकडून 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

डोंबिवलीनंतर कल्याण हादरले ! शिक्षकाकडून 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

8 year old girl student abused by teacher in Kalyan: शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

8 year old girl student abused by teacher in Kalyan: शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

8 year old girl student abused by teacher in Kalyan: शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • Published by:  Sunil Desale

कल्याण, 24 सप्टेंबर : ठाणे जिल्ह्यातील (Thane district) डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची (Minor girl gang raped in dombivli) घटना उघडकीस आली आणि एकच खळबळ उडाली. ही घटना ताजी असतानाच आता डोंबिवलीच्या शेजारील कल्याण शहरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Minor girl sexually abused by Tuition teacher in Kalyan)  केल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याण पश्चिम परिसरात आरोपी शिक्षक आणि त्याची पत्नी हा खासगी शिकवणी घेतो. त्याच्याकडे शिकवणीसाठी येणाऱ्या 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम परिसरात एक महिला शिकवणी घेते. ही महिला काही दिवसांपूर्वी बाहेरगावी गेल्याने तिचा पती सर्व विद्यार्थ्यांची शिकवणी घेत होता. याच दरम्यान त्याने आट वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. या घटनेनंतर एक दिवस चिमुकलीने शिकवणीसाठी जाण्यास नकार दिला आणि रडण्यास सुरुवात केली. यावेळी तिला पालकांनी विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला.

यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मुदर तालवाला याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कल्यामधील बाजारपेठ पोलीस अधिक तपास करत आहेत.

डोंबिवलीत 29 जणांकडून 15 वर्षीय मुलीवर 9 महिने गँगरेप

एका अल्पवयीन मुलीवर 29 मुलांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलगी ही 15 वर्षीय आहे. या सामूहिक बलात्कार प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळच्या सुमारास मानपाडा पोलिसांत एक तक्रार दिली. तिने सांगितले की जानेवारी 2021 ते 22 सप्टेंबर 2021 या कालावधीत तिच्यावर डोंबिवली, बदलापूर, रबाळे, मुरबाड या वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या ओळखीतल्या मुलांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानुसार रात्री मानपाडा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मुलगी 15 वर्षीय अल्पवयीन असल्याने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

23 आरोपी ताब्यात, दोन अल्पवयीन

या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 23 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे त्यापैकी दोन अल्पवयीन मुलं आहेत. या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आलं आहे. महिला सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या अंतर्गत प्रकरणाचा तपास करत आहेत.

आरोपींनी व्हिडीओ बनवत केलं ब्लॅकमेल

मिळालेल्या माहितीनुसार, हे कृत्य करताना आरोपींनी व्हिडीओ शूट केलं होतं आणि या व्हिडीओच्या आधारे पीडित मुलीला ते वारंवार ब्लॅकमेल करत होते. त्यानंतर आरोपींनी तिला डोंबिवली, बदलापूर, रबाळे आणि मुरबाड अशा विविध ठिकाणी नेत तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी सर्व आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

First published:

Tags: Crime news, Kalyan, Rape