मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Buldhana: 8 वर्षीय बालकावर अनैसर्गिक अत्याचार, घटनेनंतर 100 रुपये देऊन कुणालाही न सांगण्याची दिली धमकी

Buldhana: 8 वर्षीय बालकावर अनैसर्गिक अत्याचार, घटनेनंतर 100 रुपये देऊन कुणालाही न सांगण्याची दिली धमकी

Minor boy sexually assaulted by youth: लहान बालकांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. बुलढाण्यात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Minor boy sexually assaulted by youth: लहान बालकांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. बुलढाण्यात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Minor boy sexually assaulted by youth: लहान बालकांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. बुलढाण्यात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • Published by:  Sunil Desale

राहुल खंदारे, प्रतिनिधी

बुलढाणा, 17 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून लहान बालकांवर अत्याचार (children assault) होत असल्याच्या घटना वाढत असल्याचं दिसून येत आहे. पुणे आणि सातारा येथे लहान मुलांवर अनैसर्गिक अत्याचार (unnatural sex with minor boy) केल्याची घटना समोर आल्यानंतर आता असाच प्रकार बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात घडला आहे. एका 8 वर्षीय बालकावर 25 वर्षीय तरुणाने अनैसर्गिक अत्याचार केला आहे. (8 year old child sexually assaulted by 25 year old boy in Buldhana)

घरात बोलावून केला अनैसर्गिक अत्याचार

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील एका गावात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका 8 वर्षीय मुलगा झाडाखाली खेळत असताना त्याला 25 वर्षीय तरुणाने आपल्या घरात बोलावले आणि मग त्याच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केला.

100 रुपये देऊन दिली धमकी

पैशाचे आमिष दाखवून आरोपी रवींद्र उर्फ विक्की नाना ठाकरे या नराधमाने एका 8 वर्षीय बालकावर अनैतिक कृत्य केलं. या कृत्यानंतर त्या बालकाला 100 रुपये देऊन घडलेल्या घटनेसंदर्भात कुणाला सांगू नको अशी तंबी दिली. पण या मुलाने धमकीला न घाबरता घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलाच्याआईने तामगाव पोलिसांत तक्रार दाखल केली.

वाचा : पत्नीने तंबाखू दिली नाही म्हणून डोळ्यात घातलं जळतं लाकूड, महिलेचा मृत्यू

आरोपी अटकेत

पीडित मुलाच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गावातील आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विकी याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

साताऱ्यात पाच वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करुन हत्या

साताऱ्यात (Satara) एका पाच वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. आरोपीने मोबाइलवर अश्लील चित्रफित पाहत त्याचे अनुकरण करत अनैसर्गिक कृत्य केलं. धक्कादायक म्हणजे आरोपी हा सुद्धा अल्पवयीन आहे. या प्रकरणातील आरोपीने मोबाइलवर अश्लील व्हिडीओ पाहून हे कृत्य केलं आहे. इतकेच नाही तर कुणालाही घडलेला प्रकार कळू नये म्हणून आरोपीने अल्पवयीन मुलाची हत्या केली. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

पुण्यात मित्राने केला अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

पुणे (Pune) शहरात काही दिवसांपूर्वी अशी एक घटना घडली होती ज्यामुळे एकच खळबळ उडाली होती. एका अल्पवयीन मुलावर मित्रानेच शारीरिक अत्याचार (Sexual assault) केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आपला तपास केला आणि आरोपी तरुणाला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील दांडेकर पूल परिसरात ही घटना घडली होती. अल्पवयीन मुलाला स्वच्छतागृहात नेऊन त्याच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल करताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

First published:

Tags: Buldhana news, Crime, Sexual assault