मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

त्याला नका मारू.... बहीण प्रियकाच्या जीवाची भिक मागत राहिली पण ५ भावांचा खूनी बदला

त्याला नका मारू.... बहीण प्रियकाच्या जीवाची भिक मागत राहिली पण ५ भावांचा खूनी बदला

त्याला नका मारू.... बहीण विनवणी करत राहिली, पण ५ भावांनी दोघांचा घेतला खूनी बदला, जळगावात सैराट

त्याला नका मारू.... बहीण विनवणी करत राहिली, पण ५ भावांनी दोघांचा घेतला खूनी बदला, जळगावात सैराट

त्याला नका मारू.... बहीण विनवणी करत राहिली, पण ५ भावांनी दोघांचा घेतला खूनी बदला, जळगावात सैराट

     सपजळगाव : बदनामीची भीती कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात सैराट घडला आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. बहिणीला सतत घरी भेटायला येणाऱ्या तिच्या प्रियकराचा काढा ५ भावांनी मिळून काढला. बदनामी होईल या भीतीने त्यांनी प्रियकराला संपवलं. बहीण त्याच्या जीवाची भिक ५ भावांकडे मागत राहिली मात्र एकानेही ऐकलं नाही. सूडाची भावना एवढी पेटली की त्यांनी बहिणीसमोर प्रियकराला गोळी घालून संपवलं. तर त्याच्या जीवाची भिक मागत राहिली मात्र तिच्या डोळ्या देखत त्याची हत्या करण्यात आली. पाच भावांनी मिळून प्रियकराची आणि बहिणीची हत्या केली. वर्षा आणि राकेश यांचं एकमेकांवर चार वर्षांपासून प्रेम होतं. राकेश तिला भेटायला घरी देखील यायचा. तो केटरर्सचा व्यवसाय करत होता. दोघांच्या प्रेमाला वर्षाच्या कुटुंबीयांकडून विरोध होता. बदनामी होईल या भीतीनं राकेशच्या घरच्यांनी त्याला घरी येऊ नको असं सांगितलं होतं. मात्र त्याने ऐकलं नाही. १२ ऑगस्ट रोजी तो भेटायला आला असताना हा सगळा प्रकार घडला. यावेळी काकांचा मुलगा भरत, मावस भाऊ तुषार आनंदा कोळी, बंटी आणि दोन अल्पवयीन भाऊ यांनी त्याला हटकलं. त्याला आणि बहिणीला बांधून दुचाकीवर बसवलं आणि जुन्या वराड रस्त्याकडे नेलं. तिथे प्रियकराला बेदम मारहाण करण्यात आली. त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यर्थ ठरला. राकेशला मारू नका अशा विनवण्या बहीण करत राहिली. तिच्या डोळ्या देखत प्रियकराच्या डोक्यात गोळी घातली. तर विनवण्या करणाऱ्या बहिणीलाही भावाने रुमालाच्या साह्याने गळा आवळून संपवलं. त्यानंतर तो भाऊ स्वतः गावठी पिस्तूल घेऊन पोलिसांसमोर हजर झाला. जळगावच्या चोपडा परिसरात प्रेम प्रकरणातून ५ भावांनी बहिणीची हत्या केली. बदनामीच्या भीतीनं ही हत्या करण्यात आली. बहिणीचा गळा घोटून तिला संपवण्यात आलं. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. अल्पवयीन भाऊ स्वत: पोलीस स्टेशनला हजर झाला आणि त्याने संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Crime news, Jalgaon

    पुढील बातम्या