धक्कादायक! डोंबिवली खाडीतील पाण्यात आढळली 2 मुले, आईचा शोध सुरू

धक्कादायक! डोंबिवली खाडीतील पाण्यात आढळली 2 मुले, आईचा शोध सुरू

खाडीतील पाण्याच्या मधोमध टापूवर दोन लहान मुले आढळून आल्याने ग्रामस्थ हादरून गेले आहेत.

  • Share this:

डोंबिवली, 8 डिसेंबर : डोंबिवलीत एक मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवलीच्या खाडीतील पाण्याच्या मधोमध टापूवर दोन लहान मुले आढळून आल्याने ग्रामस्थ हादरून गेले आहेत. यातील एक मुलगा दीड वर्षांचा तर दुसरा 3 महिन्यांचा आहे.

पाण्यात दोन मुलं दिसताच कचोरे गावातील ग्रामस्थांपैकी दोन तरुण गणेश मुकादम आणि शंकर मुकादम हे खाडीच्या पाण्यात उतरले.  त्या दोन मुलांना पाण्यातून बाहेर काढले. या दोन्ही मुलांना विष्णूनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

याबाबत विष्णूनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी सांगितले की या मुलांना घेऊन आई खाडीजवळ आली असून आता तिचा शोध सुरू आहे. रत्नमाला साहू असं महिलेचं नाव असून सेन्हांश साहू ( दीड वर्ष) आणि अयांश साहू ( 3 महिने) अशी मुलांची नावे आहेत.

घटनास्थळी महिलेचा मोबाईल सापडल्यची माहिती ग्रामस्थांनी दिली.

लॉकडाऊनचा तणाव ठरलं कारण?

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली. याच लॉकडाऊननंतरच्या तणावामुळे सदर महिलेने हे पाऊल उचल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 8, 2020, 8:31 PM IST

ताज्या बातम्या