मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धक्कादायक ! 14 वर्षीय मुलीचं अपहरण करुन दोन जिल्ह्यांत अत्याचार, घटनेने महाराष्ट्र हादरला

धक्कादायक ! 14 वर्षीय मुलीचं अपहरण करुन दोन जिल्ह्यांत अत्याचार, घटनेने महाराष्ट्र हादरला

Minor girl abducted and raped : महिलांवर अत्याचाराच्या घटना काही थांबताना दिसत नाहीयेत. आता महाराष्ट्रातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Minor girl abducted and raped : महिलांवर अत्याचाराच्या घटना काही थांबताना दिसत नाहीयेत. आता महाराष्ट्रातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Minor girl abducted and raped : महिलांवर अत्याचाराच्या घटना काही थांबताना दिसत नाहीयेत. आता महाराष्ट्रातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

  • Published by:  Sunil Desale
सातारा, 5 डिसेंबर : एका 14 वर्षीय मुलीतं अपहरण (14 year old girl abducted) करुन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. साताऱ्यातील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी हा सुद्धा अल्पवयीनच असल्याची माहिती समोर आली (accused also minor) आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. (minor girl abducted and raped in Satara) मित्रानेच केलं अपहरण 14 वर्षीय पीडित मुलीची आरोपीसोबत ओळख होती. याच अल्पवयीन आरोपीने मुलीचं अपहरण केलं. तिला आमिष दाखवून आरोपीने पळवून नेले होते. मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली. ऑगस्ट महिन्यात या मुलीचं अपहरण झालं होतं. या प्रकरणी साताऱ्यातील शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दोन जिल्ह्यांत अत्याचार अपहरण झाल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आपला शोध सुरू केला. अखेर दोन डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलगा आणि मुलगी हे कोल्हापूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दोघांनाही कोल्हापुरातून साताऱ्यात आणले. मग पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात आली. पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की, तिच्यावर सातारा आणि कोल्हापूर येथे नेऊन अत्याचार करण्यात आले. लोकमतने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. वाचा : प्रेयसीकडून फसवणूक अन् मामाकडून धमकी, प्रेमात खच्चीकरण झालेल्या तरुणाचा हृदयद्रावक शेवट डोंबिवलीत 15 वर्षीय मुलीवर 9 महिने गँगरेप सप्टेंबर महिन्यात डोंबिवलीतील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पीडित मुलगी ही 15 वर्षीय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळच्या सुमारास मानपाडा पोलिसांत एक तक्रार दिली. तिने सांगितले की जानेवारी 2021 ते 22 सप्टेंबर 2021 या कालावधीत तिच्यावर डोंबिवली, बदलापूर, रबाळे, मुरबाड या वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या ओळखीतल्या मुलांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानुसार मानपाडा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मुलगी 15 वर्षीय अल्पवयीन असल्याने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी व्हिडीओ बनवत केलं ब्लॅकमेल मिळालेल्या माहितीनुसार, हे कृत्य करताना आरोपींनी व्हिडीओ शूट केलं होतं आणि या व्हिडीओच्या आधारे पीडित मुलीला ते वारंवार ब्लॅकमेल करत होते. त्यानंतर आरोपींनी तिला डोंबिवली, बदलापूर, रबाळे आणि मुरबाड अशा विविध ठिकाणी नेत तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी सर्व आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
First published:

Tags: Crime, Rape, Satara

पुढील बातम्या