पुणे, 14 नोव्हेंबर : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (babasaheb purandare) यांची प्रकृती चिंताजनक आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (deenanath mangeshkar hospital) त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे कुंटुबातील सदस्य सध्या रुग्णालयात दाखल झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना न्युमोनिया झाला होता त्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्रकती आणखी खालावली. बाबासाहेब पुरंदरे काही दिवसांपूर्वी घरात पडले होते, त्यांच्या डोक्याला मार लागला होता त्यानंतर दिनानाथ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती बाबासाहेब यांचा मुलगा अमृत पुरंदरे यांनी दिली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली जात आहे.
Honey Trap : पाकिस्तानी महिलेच्या जाळ्यात अडकला, जवानाचं शरमेनं धक्कादायक कृत्य
अलीकडेच पुरंदरे यांनी शंभरी पर्दापण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून राज्यातील सर्वच नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होता. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवलं. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता.
Upcoming IPO : या आठवड्यात कमाईची पुन्हा संधी; दोन कंपन्यांचे IPO ओपन होणार
बाबासाहेब पुरंदरे यांनी ऐतिहासिक विषयांवर ललित लेखन केलं. त्याचबरोबर त्यांनी नाट्यलेखन आणि जाणता राजा नाटकाचे दिग्दर्शन केलं. 2015 मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर 2019 मध्ये पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरंदरे यांनी लिहिलेल्या जाणता राजा या महानाट्याचे राज्यभरात हजारो प्रयोग झाले. तब्बल २७ वर्षांत १२५० हून जास्त प्रयोग झाले. या नाटकाचे हिंदी आणि इंग्रजीसह इतर ५ भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.