मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

असा अलौकिक शिवअराधक होणे नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त

असा अलौकिक शिवअराधक होणे नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त

 बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.

  • Published by:  Pooja Vichare

पुणे, 15 नोव्हेंबर: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir Babasaheb Purandare) यांचे पुण्यात (Pune) आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.

शिवशाहीर बाबासाहेबांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्र्यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना अशा शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री काय म्हणाले

काही महिन्यांपूर्वीच शिवशाहीर बाबासाहेंबाच्या शंभरीत पदार्पणानिमित्त अभिष्टचिंतनाचा योग आला होता. त्यावेळीही बाबासाहेबांनी आपल्या दिलखुलास स्वभावाप्रमाणे प्रकृती अस्वास्थ्यावर मात करत सगळ्यांसोबत उत्साहात वाढदिवस साजरा केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची चिरंतन आराधना हाच शिवशाहीर बाबासाहेबांच्या शतायुष्याचा ऊर्जास्त्रोत राहीला आहे. त्यासाठी त्यांनी शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत असा मुलूख पालथा घालण्यासाठी जीवाचे रान केले.

जिथे-जिथे महाराजांचा स्पर्श झालेल्या वस्तू, वास्तू आणि गडकोट-किल्ले तिथे-तिथे बाबासाहेब पोहचले. त्यांनी संदर्भ, माहिती गोळा केली, अभ्यास-संशोधन केले आणि तितक्याच तन्मयतेने शिवमहिमा केवळ महाराष्ट्र, देश नव्हे तर जगभर पोहचविला. घरा-घरात शिवभक्त निर्माण व्हावेत आणि या शिवभक्तांना त्यांच्या आराध्याच्या तेजःपुंज पैलूंचे दर्शन घडवावे, यालाच बाबासाहेबांनी जीवन कार्य मानले. दिगंतरात विलीन झाल्यावरही ते तिथेही शिवराय चरणी लीन होतील.

हेही वाचा- ''शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाचं दु:ख शब्दांमध्ये मांडता येणार नाही''

शिवमहिमा, शिवरायांच्या दिगंत किर्तीची कवने लिहीण्यात आणि ती तडफदार आवाजात, आवेशात पोहचवण्यासाठी दंग होतील. पुरंदरेवाडा हा अनेकांसाठी अनेक अर्थांनी आधार होता. हा आधारवड त्यांच्या निधनामुळे अंतर्धान पावला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि कला परंपरा क्षेत्राला एका व्रतस्थ आणि ऋषीतुल्य अशा मार्गदर्शकाची उणीव भासत राहील. शिवचरित्राच्या अखंड पारायणालाच आयुष्य मानणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो अशी जगदंबा चरणी प्रार्थना. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (shivshahir babasaheb purandare) यांचं निधन झालं आहे. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र आज एका इतिहास पूत्र मुकल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती खालावली होती. त्यांना न्युमोनिया झाला होता, त्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बाबासाहेब पुरंदरे काही दिवसांपूर्वी घरात पडले होते, त्यांच्या डोक्याला मार लागला होता त्यानंतर दिनानाथ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती, अशी माहिती बाबासाहेब यांचा मुलगा अमृत पुरंदरे यांनी दिली. पण उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अलीकडेच पुरंदरे यांनी शंभरी पर्दापण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून राज्यातील सर्वच नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

हेही वाचा- दंश केलेल्या कोब्राला घेऊन स्वत: सर्पमित्रानं गाठलं रुग्णालय; जळगावातील अंगावर काटा आणणारी घटना 

बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे असं त्यांचं पूर्ण नाव होतं. पुण्याजवळच्या सासवडमध्ये 29 जुलै 1922 रोजी त्यांचा जन्म झाला. तरुणपणापासून ते पुण्यातच स्थायिक झाले. त्यानंतर भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेतून कामाला सुरुवात केली. पुणे विद्यापीठाच्या ’मराठा इतिहासाची शकावली- सन 1740 ते 1761’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते. 2015 सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.

बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन आणि जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. त्यांना 2015 साली महाराष्ट्रभूषण तर 2019 साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा या महानाट्याचे गेल्या 27 वर्षांत 1250 हून अधिक प्रयोग झाले आहेत. हे नाटक हिंदी-इंग्रजीसह 5 अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे.

First published:

Tags: Uddhav Thackeray (Politician)