मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'जाणता राजा' घराघरात पोहोचवणारा तारा निखळला, कसा होता बाबासाहेब पुरंदरेंचा प्रवास?

'जाणता राजा' घराघरात पोहोचवणारा तारा निखळला, कसा होता बाबासाहेब पुरंदरेंचा प्रवास?

शिवाजी महाराजांचे चरित्र उभ्या महाराष्ट्राच्या घराघरात नेणाऱ्या, अमोघ वक्तृत्वाने मराठीजनांना खिळवून ठेवून त्यांच्यात वीरश्री अन राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचा शब्दयज्ञ तब्बल साठहून अधिक वर्षे करणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे  (shivshahir babasaheb purandare ) निधन झाले आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Trending Desk
पुणे, 15 नोव्हेंबर: शिवाजी महाराजांचे चरित्र उभ्या महाराष्ट्राच्या घराघरात नेणाऱ्या, अमोघ वक्तृत्वाने मराठीजनांना खिळवून ठेवून त्यांच्यात वीरश्री अन राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचा शब्दयज्ञ तब्बल साठहून अधिक वर्षे करणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे  (shivshahir babasaheb purandare ) निधन झाले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. यावेळी रूग्णालयात त्याचं नातेवाईक उपस्थित होते. अलीकडेच बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभरी पर्दापण केले होते.  यानिमित्त पुण्यात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक राजकीय नेत्यांनी ऑनलाईन उपस्थिती लावत बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्या पुण्यातील या शंभरीच्या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. वाचा : स्वातंत्र्य भीक मिळाल्याच्या कंगनाच्या विधानाला विक्रम गोखलेंचा पाठिंबा पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे काही वर्षांपूर्वी निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात चिरंजीव अमृत आणि प्रसाद तसेच कन्या माधुरी असा परिवार आहे. पुरंदरे यांच्या कन्या माधुरी या ज्येष्ठ बालसाहित्यिक आणि गायिका आहेत. ज्येष्ठ चिरंजीव अमृत हे पुरंदरे प्रकाशनची जबाबदारी समर्थपणे सांभाळतात तर, लहान चिरंजीव प्रसाद यांनी नाट्य तसेच दुचाकींच्या क्रीडा प्रकारात काम केले आहे. समाजप्रिय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा संपर्क अनेक क्षेत्रांशी असल्याने केवळ पुण्यातीलच नव्हे तर देशातील त्यांच्या हजारो जणांना धक्का बसला आहे. वाचा : बॉयकॉट आणि अटकेच्या चर्चेत बिनधास्तपणे पार्टीत डान्स करताना दिसली कंगना बाबासाहेब पुरंदरे यांची साहित्य संपदा बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन केले. त्याशिवाय, ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखनही केले. 'जाणता राजा' या ऐतिहासिक गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन केले. राजा शिवछत्रपती, पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड आदी साहित्य प्रकाशित झाले आहे. राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या 16 आवृत्ती प्रकाशित झाल्या असून 5 लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत. 2015  साली महाराष्ट्रभूषण तर 2019 साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला बाबासाहेब पुरंदरे यांचं मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असं आहे. पुण्याजवळच्या सासवडमध्ये 29 जुलै 1922 रोजी त्यांचा जन्म झाला. पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम सुरु केलं.  बाबासाहेब पुरंदरे  यांना 2015  साली महाराष्ट्रभूषण तर 2019 साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे.बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले.
First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, Pune

पुढील बातम्या