Home /News /maharashtra /

शिवशाही बसच्या धडकेत 3 मुलांवरील आईचे छत्र हरपले, वाशिंदजवळ भीषण घटना

शिवशाही बसच्या धडकेत 3 मुलांवरील आईचे छत्र हरपले, वाशिंदजवळ भीषण घटना

वाशिंद इथं आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. पती-पत्नी आपल्या 3 मुलांसह दुचाकीवरून शहापूरकडे जात होती.

भिवंडी, 12 नोव्हेंबर : मुंबई-नाशिक महामार्गावरील (Mumbai-Nashik Highway) वाशिंद इथं शिवशाही बस (shivshai bus) आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला आहे. बसने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तर 3 मुले आणि वडील गंभीर जखमी झाले आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाशिंद इथं आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. पती-पत्नी आपल्या 3 मुलांसह दुचाकीवरून शहापूरकडे जात होती. मुंबई नाशिक- महामार्गावरून दुचाकीवरून जात असताना वाशिंदजवळ रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. नेमके त्याचवेळी आलेल्या भरधाव शिवशाही एसटी बसने जोरात धडक दिली. बसने जोरात धडक दिल्यामुळे यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. सावधान! कोरोनाची दुसरी लाट येणार, औषध प्रशासन मंत्र्यांनी दिले संकेत तर पती आणि 3 मुलं गंभीर जखमी झाले आहे. जखमींना शहापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  या अपघातात मृत महिलेची अद्याप ओळख पडू शकली नाही. या अपघातामुळे काही वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनास्थळी वाहतूक पोलिसांनी धाव घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली आहे. या प्रकरणी शिवशाही एसटी बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. चंद्रपुरात 17 वर्षीय मुलाला ट्रॅक्टरने चिरडले दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात अवैध वाळू तस्करी  करणाऱ्या ट्रॅक्टरने बकऱ्या चरण्यासाठी गेलेल्या एका 17 वर्षीय युवकाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजुरा तालुक्यातील विहीरगाव इथं ही घटना घडली आहे. मृतकाचे नाव उमेश सोनुरले (वय 17) असे आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची आत्महत्या! नैराश्यामुळे उचललं टोकाचं पाऊल उमेश  नेहमी प्रमाणे बकऱ्या चारण्यासाठी घेऊन निघाला होता. गावाच्या रस्त्यावरून जात असताना अचानक एक वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने उमेशला धडक दिली. धडक बसल्यानंतर उमेश जागीच कोसळला आणि ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडला. त्यात उमेशचा जागीच मृत्यू झाला. हा ट्रॅक्टर गावातील नाल्यातून अवैध वाळूचा उपसा करून चालला होता. उमेशचा मृत्यू झाल्यामुळे ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. उमेशच्या मृत्यूची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी एकच गर्दी झाली. ‘दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे फटाके वाजणार’ नारायण राणे यांनी दिला इशारा गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर उमेशचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर उमेशचा मृत्यू झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या