महाराष्ट्रात भाजपला अंगावर घेणारी शिवसेना लोकसभेत तटस्थ

महाराष्ट्रात भाजपला अंगावर घेणारी शिवसेना लोकसभेत तटस्थ

काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 नोव्हेंबर : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर लोकसभेत मोठा गोंधळ सुरू झाला आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. मात्र यावेळी शिवसेनेचे खासदार तटस्थ असल्याचं दिसत आहे.

भोपाळमधून खासदार झाल्यानंतर प्रज्ञासिंह ठाकूर यांचा अनेक तोल सुटल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असंही साध्वी प्रज्ञा नुकतंच बरळल्या. त्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज साध्वी प्रज्ञा यांनी लोकसभेत माफी मागितली आहे.

समितीतून हकालपट्टी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे यांना पुन्हा 'देशभक्त'संबोधणाऱ्या भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर अडचणीत सापडल्या आहेत. प्रज्ञासिंह ठाकूर यांची संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीच्या सल्लागारपदावरून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी संसदेत केलेले कथित वक्तव्य अत्यंत निंदनीय असून भाजप अशा विचारधारेचे समर्थन करत नाही, असे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सांगितले आहे. प्रज्ञासिंह यांना आता भाजपच्या संसदीय बैठकीतही सहभागी होता येणार नसल्याचेही नड्डा यांनी सांगितले आहे.

दरम्यान, खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी बुधवारी लोकसभेत एका चर्चा सत्रात महात्मा गांधींची हत्या करणारे नथुराम गोडसे यांन देशभक्त संबोधले होते. त्यावरून लोकसभेत एकच गदारोळ झाला होता. याआधी लोकसभा निवडणूक सुरू असतानाही गोडसेला देशभक्त संबोधले होते. प्रज्ञा यांना कधीही मनापासून माफ करू शकणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.

उत्तर प्रदेशातले भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. आता त्यांनी नथुराम गोडसेबद्दल साध्वींनी केलेल्या वक्तव्याची री ओढली. साध्वी प्रज्ञासिंह यांनी मुंबई हल्ल्यातले शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दलही आक्षेपार्ह विधान करून राळ उडवून दिली होती. लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे एकच गदारोळ झाला होता. साध्वी प्रज्ञा यांची संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीच्या सल्ल्गारपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावर मोठी टीका झाली. आता त्यांच्या या वक्तव्यानंतर संसदीय समितीमधून त्यांना काढून टाकण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2019 12:43 PM IST

ताज्या बातम्या