नाशिक, 25 फेब्रुवारी : नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापले आहे. स्थायी समिती सभापतीच्या निवडीवरून भाजप आणि शिवसेनेत संघर्ष शिगेला पोहोचला आहे. सांगली महापालिका निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे नाशिकमध्ये भाजपने खबरदारी घेतली आहे.
स्थायी समितीच्या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून भाजपने आपले नवनियुक्त 8 स्थायी सदस्य सहलीवर पाठवले आहे. आक्रमक झालेल्या शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. भाजपची 2 मतं फोडण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जोरदार हालचाली सुरू आहे. दोनच दिवसांपूर्वी सांगली महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपचा कार्यक्रम केला होता. भाजपच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले होते. त्यामुळे नाशिकमध्ये सांगलीचा प्रकार होऊ नये म्हणून भाजपकडून खबरदारी घेतली जात आहे.
VIDEO: तरुणीला वेड लागलं कार्तिकचं; प्रपोज करण्यासाठी रात्रभर घरासमोर होती उभी
सत्ताधारी भाजपकडे 8 तर महाविकास आघाडीकडे 7 सदस्य आहे. यात मनसेचं 1 मत निर्णायक ठरणार आहे. मनसेचा कल सुद्धा भाजपच्या बाजूनं असल्याची अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे मनसे भाजपला टाळी देणार की तटस्थ राहणार पाहण्याचे ठरणार आहे.
प्रेरक कथा! चार महिला, ज्यांनी घराचा उंबरठा ओलांडत उजळलं स्वत:सह इतरांचं आयुष्य
दरम्यान, स्थायी सदस्य निवडणूक वादग्रस्त झाली आहे. सत्ताधारी भाजपच्या धक्कातंत्रावर शिवसेनेनं कुरघोडी केली आहे. भाजपच्या 4 सदस्यांचा राजीनामा न घेता इतर सदस्यांची नियुक्ती केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. त्यानंतर सेनेच्या आरोपाला नगरसचिवांनी चक्क लेखी दुजोरा दिला आहे. तर सर्वपक्षीय गटनेत्यांची पत्र आपल्याकडे असल्याचा दावा भाजपने केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.