Elec-widget

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची डोकेदुखी वाढली, युतीत तणाव

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची डोकेदुखी वाढली, युतीत तणाव

मतदारसंघात उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्पर्धेतून युतीला बंडखोरीचा सामाना करावा लागत आहे.

  • Share this:

हर्षल महाजन, नागपूर, 11 ऑक्टोबर : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात शिवसैनिकांनी भाजपविरोधात दंड थोपटले आहेत. युती असतानाही दक्षिण नागपूर मतदारसंघात सेनेच्या उमेदवारानं बंडखोरी केली. अपक्ष म्हणून रिंगणात असलेल्या किशोर कुमेरिया या उमेदवारासाठी शिवसैनिक एकत्र आले आहेत.

अपक्ष उमेदवाराच्या प्रचारासाठी शहरातील सर्व शिवसैनिकांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात सेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उघडपणे सेनेनं भाजपच्या विरोधात एकप्रकारे मोहीमच उघडली आहे. दक्षिण नागपूर मतदार संघात सेनेचे शहराध्यक्ष किशोर कुमेरिया अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. मात्र, ते शिवसेनेचाच उमेदवार म्हणून प्रचार करत आहेत.

मेळाव्यात सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या उमेदवाराला विरोध करत अपक्ष असलेले कुमेरिया यांना निवडून अणण्याचा संकल्प केला. 'भाजपकडून सन्मान मिळत नाही आणि ज्या ज्या वेळी युती झाली त्या त्या वेळी भाजपनं युती धर्म पाळला नाही. त्यामुळे आम्ही यावेळी युती न पाळण्याचा निर्णय घेतला आहे,' असं सेनेचे जिल्ह्याप्रमुख प्रकाश जाधव यांनी यावेळी जाहीर केलं आहे.

भाजप-शिवसेनेच्या 50 जागा धोक्यात, विधानसभेचं गणित बदलणार?

भाजप आणि शिवसेनेसाठी यंदाची विधानसभा निवडणूक सोपी असल्याचं मानलं जात असतानाच युतीला धक्का बसला आहे. कारण जवळपास 50 मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी भाजप-सेना युतीची डोकेदुखी वाढवली आहे.

Loading...

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये निवडणुकीची घोषणा होण्याआधीच मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालं होतं. त्यामुळे मतदारसंघात उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्पर्धेतून युतीला बंडखोरीचा सामाना करावा लागत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सोलापूर, कोकणातील कुडाळ, सावंतवाडी, गुहागर यासह विदर्भ आणि मराठवाड्यातीलही अनेक जागांवर युतीतील नाराज नेत्यांनी बंडाचं अस्त्र उगारलं आहे. त्यामुळे बंडखोर नेते भाजप-शिवसेनेचं गणित बिघडवणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मंत्री होण्यासाठी एकाने 20 कोटी मोजले, अजित पवारांची UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 10:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...