काँग्रेस सोडणाऱ्या आमदाराला धक्का, पक्षांतर करूनही तिकीट मिळणार नाही?

शिवसैनिकही कांबळेंच्या उमेदवारीला विरोध करताना दिसत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2019 09:47 AM IST

काँग्रेस सोडणाऱ्या आमदाराला धक्का, पक्षांतर करूनही तिकीट मिळणार नाही?

हरिष दिमोटे, अहमदनगर, 30 सप्टेंबर : श्रीरामपूर येथील काँग्रेसचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र आता त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच विरोध केला आहे. 'ससाणे, विखे आणि थोरातांशी गद्दारी करणाऱ्या आमदाराला पाडायचं,' असे बॅनर काही दिवसापूर्वी श्रीरामपूर शहरात झळकले होते. त्यानंतर आता शिवसैनिकही कांबळेंच्या उमेदवारीला विरोध करताना दिसत आहेत.

गेल्या दहा वर्षापासून श्रीरामपूर मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदार भाऊसाहेब कांबळे यांना अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. 2009 साली अनुसूचित जातीसाठी राखीव झालेल्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात जयंत ससाणे यांनी भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिली आणि त्यांना श्रीरामपूरचं आमदार केलं.

2014 मध्येही पुन्हा ससाणे आणि विखेंच्या मदतीने भाऊसाहेब कांबळे श्रीरामपूर विधानसभेचे आमदार झाले. मात्र दोन वर्षांपूर्वी ससाणे गटातील अंतर्गत धुसफूसीमुळे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी नगरपालिका निवडणुकीत ससाणे गटाची साथ सोडली आणी विरोधी गटाचा हात धरला. अगोदरच आजारपणाशी लढा देत असलेल्या ससाणे यांना कांबळे यांचा हा पवित्रा अतिशय धक्का देणारा होता. तेव्हापासून ससाणे गट कुठल्याही परिस्थितीत भाऊसाहेब कांबळे यांना मदत करायला तयार नाही, असं चित्र आहे.

विखे पाटलांच्या जवळ गेलेल्या भाऊसाहेब कांबळे यांना काँग्रेसकडून विखे पाटील यांनी 2019 ची शिर्डी लोकसभेची उमेदवारीही मिळवून दिली. मात्र दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे यांच्या जागेच्या सुरू असलेल्या वादात विखे पाटील यांनी कांबळे यांना थांबण्याचा सल्ला दिलेला असताना त्यांनी विखेंचे विरोधक असलेल्या बाळासाहेब थोरात यांचा हात धरला. कांबळे यंनी शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकही लढवली. मात्र दोन लाख मतांनी त्यांचा पराभव झाला. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत जाऊनही तिकीट न मिळाल्यास भाऊसाहेब कांबळे यांची अडचण होणार आहे.

साताऱ्यातील उमेदवारीबाबत पृथ्वीराज चव्हाण घेणार दोन दिवसांत निर्णय?

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 09:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...