शिवसेना खासदाराला घेरण्यासाठी शिवसैनिकच एकवटले, अडचणी वाढणार?

शिवसेना खासदाराला घेरण्यासाठी शिवसैनिकच एकवटले, अडचणी वाढणार?

विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्याने राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं.

  • Share this:

कोल्हापूर, 1 नोव्हेंबर : कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्याविरोधात विधानसभा निवडणुकीत पराभूत उमेदवारांनी वज्रमूठ बांधलेली पाहायला मिळत आहे. कोल्हापूरमध्ये नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संजय मंडलिक यांनी महायुतीच्या उमेदवारांना मदत केलीच नाही, असा सूर उमटल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळाली आहे.

विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्याने राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. कारण लोकसभा निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही 'आमचं ठरलंय'चा नारा देण्यात आला होता. शिवसेना आणि भाजपची युती झाली असतानाही खासदार संजय मंडलिक यांनी या निवडणुकीत काँग्रेसच्या सतेज पाटील गटाला मदत केल्याचा आरोप करण्यात येत आहे. खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही याबाबत भाष्य केलं होतं.

काँग्रेससोबत छुपी युती केल्याचा आरोप होत असल्याने संजय मंडलिकांविरोधात शिवसैनिकांमध्येही नाराजी आहे. त्यामुळे शिवसेनेचे पराभूत उमेदवार आणि पदाधिकारी दोन ते तीन दिवसात मंडलिकांच्या बाबतचा अहवाल मातोश्रीवर पाठवणार असल्याची गोपनीय माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे खासदार मंडलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोल्हापुरात लोकसभेच्या धर्तीवरच विधानसभेतही आमचं ठरलंय ही टॅगलाईन धुमाकूळ घालताना दिसत होती. असं सोईचं राजकारण करणाऱ्या शिवसेनेला चंद्रकांत पाटील भाजप मेळाव्यातूनच जाहीर इशारा दिला होता. मात्र आमचं ठरलंय याच टॅगलाईनच्या जोरावर शिवसेनेचे संजय मंडलिक खासदार बनले अर्थात त्यासाठी त्यांना बंटी पाटलांनी छुपी मदत केल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. याच पराभवानंतर धनंजय अर्थात मुन्ना महाडिक हे राष्ट्रवादीसोडून भाजपात डेरेदाखलही झाले.

विधानसभेच्या निमित्ताने बंटी पाटील आणि मुन्ना महाडिकचा गट पुन्हा आमनसामने आला. भाजपतर्फे अमोल महाडिक तर काँग्रेसतर्फे ऋतूराज पाटील मैदानात होते. पण लढतीत संजय मंडलिक यांनी काँग्रेसच्या ऋतुराज पाटील यांना मदत केल्याचं बोललं जात आहे. हीच मदत आता संजय मंडलिक यांना भोवणार का, हे पाहावं लागेल.

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 03:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading