मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Nitesh rane : नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळताच शिवसैनिकांनी फोडले फटाके VIDEO

Nitesh rane : नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळताच शिवसैनिकांनी फोडले फटाके VIDEO

 शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ला प्रकरणामुळे कणकवलीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष कमालीचा शिगेला पोहोचला

शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ला प्रकरणामुळे कणकवलीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष कमालीचा शिगेला पोहोचला

शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ला प्रकरणामुळे कणकवलीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष कमालीचा शिगेला पोहोचला

सिंधुदुर्ग, 30 डिसेंबर :  सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत (Sindhudurg District Cooperative Bank Election) शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ला प्रकरणामुळे कणकवलीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष कमालीचा शिगेला पोहोचला आहे. दोन दिवसांच्या सुनावणीनंतर भाजप आमदार नितेश राणे यांचा जामीन (nitesh rane bail reject)  अर्ज फेटाळण्यात आला आहे, त्यामुळे शिवसैनिकांनी (kankavali shivsena) फटाके फोडून एकच जल्लोष केला आहे.

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांचा अटकपूर्वी जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकच जल्लोष केला आहे.

नितेश राणे अजूनही बेपत्ता, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन

नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यांच्यासोबत उमेदवार मनीष दळवींचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे नितेश राणे यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. कोर्टात खटला सुरू असताना नितेश राणे हे बेपत्ता झाले होते. त्यांचा अजूनही शोध लागला नाही. कोर्टाचा निकाल आल्यामुळे नितेश राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांना पूर्ण अधिकार बहाल झाला आहे.

नितेश राणे यांचा शोध घेण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस शोध घेत आहे. जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आहे. नितेश राणे यांना हायकोर्टात धाव घेण्याची मुभा जरी असली तरी त्यांना आधी पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार आहे.

नितेश राणे घेणार हायकोर्टात धाव

शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ला प्रकरणी अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यांच्या जामीन अर्जावर गेल्या दोन दिवसांपासून सुनावणी सुरू होती. अखेरीस आज त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

जिल्हा सत्र न्यायालयातून आम्हाला ऑर्डर कॉपी मिळणार आहे. ती अद्याप मिळाली नाही. उद्या सकाळी ही पत्र मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर आम्ही हायकोर्टात याचिका दाखल करू. पण, अजून कॉपी मिळाली नाही, अशी माहिती नितेश राणे यांचे वकिल संग्राम देसाई यांनी सांगितलं.

उद्या शुक्रवार आला आहे, उद्या कॉपी मिळाल्यानंतर हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली जाईल. त्यानंतर शनिवार आणि रविवार आला आहे, त्यामुळे दोन दिवस सुट्टी आहे. सोमवारी कामाचा दिवस आहे, त्यादिवशी सुनावणी होऊ शकेल किंवा मंगळवारी सुद्धा सुनावणी होऊ शकते, असंही देसाई यांनी सांगितलं.

First published:
top videos