शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला शिवसैनिकांनी दिला बेदम चोप, LIVE VIDEO

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला शिवसैनिकांनी दिला बेदम चोप, LIVE VIDEO

शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी सतत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या एका इसमाला चंद्रपूरकर शिवसैनिकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

  • Share this:

हैदर शेख, प्रतिनिधी

चंद्रपूर, 20 मार्च : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला शिवसैनिकांनी बेदम चोप दिला. तसंच तोंडाला काळे फासून आणि गळ्यात चप्पलांचा हार घालून गावात धिंडही काढली. सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी-कोकोवाडा गावात ही घटना घडली.

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी सतत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या एका इसमाला चंद्रपूरकर शिवसैनिकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या पेंढरी- कोकेवाडा येथे राहणारा जितेंद्र राऊत हा इसम गेले काही दिवस सातत्याने महाराजांविषयी आक्षेपार्ह आणि निंदाजनक पोस्ट करत होता.

त्याने संभाजी महाराजांबद्दल ही अशाच पद्धतीने फेसबुक पोस्ट केल्या होत्या. स्थानिक शिवसैनिक आणि पोलिसांनी यासंदर्भात त्याला पोलीस ठाण्यात बोलावून समजही दिली होती. सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे पोलिसांना रीतसर निवेदनही दिले होते.

मात्र, यानंतरही या पोस्ट सुरूच राहिल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी पेंढरी-कोकेवाडा या गावात पोचून त्याची बेदम धुलाई केली.

या इसमाचा तोंडाला काळे फासले. त्याची सिंदेवाही तालुकास्थानी धिंड काढून पोलिसांच्या स्वाधीन केले गेले.

दरम्यान या व्यक्तीकडून महाराजांविषयी माफी देखील मागून घेण्यात आली. जितेंद्र राऊतविरुद्ध शिवसैनिकांनी सिंदेवाही येथे रीतसर तक्रार देखील दाखल केली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात गुन्हे नोंदविण्याची कारवाई सुरू असून सिंदेवाही शहरात झालेल्या धिंड काढण्याच्या प्रकाराने मोठा जमाव एकत्र झाला होता. या व्यक्तीने सातत्याने शिवरायांबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकत होता. त्याला समजही देण्यात आला होता, पण त्याने ऐकले नाही, त्यामुळे शिवसेनेनं आपल्या पद्धतीने  समज दिल्याचं जिल्हा प्रमुखांनी सांगितलं.

First published: March 20, 2020, 1:36 PM IST

ताज्या बातम्या