अमरावती, 14 एप्रिल : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा (ravi rana) आता शिवसैनिकांच्या रडारवर आले आहे. रवी राणा अमरावतीतील आपल्या निवासस्थानी दाखल झाल्यानंतर शिवसैनिक जाब विचारण्यासाठी येणार अशी माहिती मिळाली. त्यामुळे राणा यांच्या समर्थकांची लाठ्या-काठ्या घेऊन त्यांच्या निवास्थानाबाहेर गर्दी केली आहे. त्यामुळे अमरावतीत शिवसेना विरुद्ध रवी राणा वातावरण पेटले आहे.
रवी राणा यांनी शिवसेनेवर टीका केल्यानंतर शिवसेना कार्यकर्ते रवी राणा यांच्या निवासस्थानी येणार असल्याने प्रत्युत्तर देण्यासाठी राणा समर्थकांची मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. यावेळी रवी राणा यांच्या समर्थनार्थ समर्थकांच्या जोरदार घोषणाबाजी केली आहे.
अमरावतीत रवी राणा विरुद्ध शिवसेना वातावरण पेटले,रवी राणा यांच्या निवासस्थानी हातात काठ्या घेऊन राणा समर्थक जमले pic.twitter.com/0L7pv7Qe9b
— News18Lokmat (@News18lokmat) July 14, 2021
'राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या निवास्थानाच्या बाहेर निघत नाही. शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत नाही, विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेत नाही, वारंवार पत्र देवून सुद्धा मुख्यमंत्र्यांना जाग येत नाही, त्यामुळे मुख्यमंत्री बेशरम आहे, त्यांच्या घरासमोर बेशरमाचे झाड लावून निषेध करेल' अशी टीका रवी राणा यांनी केली होती.
त्यामुळे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रवी राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी येणार असल्याची वार्ता कळताच हजारो युवा स्वाभिमानी कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने आज आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानी सकाळी 7 वाजेपासून जमा झाले. आता येणार मग येणार असे करता करता दुपार झाली पण एकही शिवसैनिक तिथे फिरकला नाही. त्यामुळे रवी राणा यांना शिवसेना आव्हान देवू शकत नाही, असं मत युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे. अजूनही कार्यकर्ते रवी राणा यांच्या निवास्थानाबाहेर तळ ठोकून आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.