मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जळगावात शिवसेना कार्यकर्त्यांची दादागिरी, खाद्यपदार्थांचे पैसे मागणाऱ्या दुकानदाराला नेलं फरफटत, पाहा VIDEO

जळगावात शिवसेना कार्यकर्त्यांची दादागिरी, खाद्यपदार्थांचे पैसे मागणाऱ्या दुकानदाराला नेलं फरफटत, पाहा VIDEO

महाविकास आघाडीच्या ‘महाराष्ट्र बंद’दरम्यान जळगावमध्ये (Shivsena worker tries to threaten shopkeeper in Jalgaon) शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यानं दादागिरी केल्याचा आरोप एका दुकानदारानं केला आहे.

  • Published by:  desk news

जळगाव, 11 ऑक्टोबर : महाविकास आघाडीच्या ‘महाराष्ट्र बंद’दरम्यान जळगावमध्ये (Shivsena worker tries to threaten shopkeeper in Jalgaon) शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यानं दादागिरी केल्याचा आरोप एका दुकानदारानं केला आहे. या महिलेनं दुकानातून खाद्यपदार्थ विकत घेतले, मात्र पैसे द्यायला (Shivsena worker denied to pay money) नकार दिल्याचा आरोप दुकानदारानं केला आहे. महाराष्ट्र बंददरम्यान शहरातून फिरणाऱ्या या महिलेनं गाडीतून उतरून शेकडो रुपयांचे पदार्थ विकत घेतले, मात्र पैसे मागितल्यावर ते द्यायला नकार दिल्याचा दावा या दुकानदाराने केला आहे.

अशी घडली घटना

महाराष्ट्रात सोमवारी महाविकास आघाडी ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी झाली होती. यावेळी जळगावमध्ये काही दुकानं सुरु होती. शहरातून फेरफटका मारताना शिवसेनेच्या एका महिला कार्यकर्त्याने आईस्क्रीम पार्लरपाशी गाडी थांबवली. आईस्क्रीम पार्लरमध्ये येऊन तिने काही शीतपेयं आणि खाद्यपदार्थ ऑर्डर केले. हे पदार्थ घेतल्यानंतर दुकानदारानं बिलाची रक्कम सांगितलं. मात्र आपल्याकडे पैसे नसून गाडीत असल्याचं या महिलेनं सांगितलं. गाडीतून पैसे आणून देते, असं म्हणत ही महिला गाडीकडे गेली.

दुकानदाराची ‘फरफट’

महिला कार्यकर्ता गाडीत बसली आणि पैसे देण्याऐवजी खिडकीची काच तिने लावून घेतली, असा आरोप दुकानदाराने केला आहे. आपण पैसे मागण्यासाठी गाडीपाशी गेलो आणि पैशांची मागणी केली, मात्र पैसे देण्याऐवजी ड्रायव्हरने गाडी सुरु केली. गाडीला पकडलेल्या दुकानदाराने पैशांची मागणी सुरु ठेवली. मात्र त्याला न जुमानता कार्यकर्त्यांनी गाडी पुढं हाकण्याचा प्रयत्न केला. यात दुकानदार गाडीखाली येण्यापासून थोडक्यात बचावल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेत दुकानदाराला जखमाही झाल्या आहेत.

जनतेनं केलं शूटिंग

हा प्रकार घडत असताना दुकानाबाहेर मोठी गर्दी जमली होती. दुकानदाराला फरफटत नेत असल्याचं पाहून अनेकांनी आपले मोबाईल बाहेर काढले आणि शूटिंग करायला सुरुवात केली. ते पाहून कार्यकर्त्यांनी गाडी थांबवल्याचं दुकानदारानं सांगितलं आहे. जळगावमध्ये या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा सुरू असून कार्यकर्त्यांवर पक्षाकडून आणि पोलिसांकडून काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

हे वाचा - लातुर: गुटखा किंगला हादरा; 2 दिवसांच्या छापेमारीत तब्बल सव्वा कोटींचा गुटखा जप्त

शिवसेनेनं आरोप फेटाळले

आम्ही दुकानदारांना सांगून नाश्त्याची सोय केल्याचा दावा शिवसेनेचे स्थानिक नेते विष्णू भंगाळे यांनी केला आहे. दुकानदार आपल्या सोबत असल्याचं सांगत कुणावरही आपण बळजबरी केली नसल्याचं ते म्हणाले. ज्यांनी दुकानं बंद केली आहेत, ती स्वखुशीनं केल्याचा दावा त्यांनी केला.

First published:

Tags: Jalgaon, Shivsena, महाराष्ट्र