मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी तिरुपती बालाजीला पायी निघालेल्या कट्टर शिवसैनिकाचा मृत्यू

मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी तिरुपती बालाजीला पायी निघालेल्या कट्टर शिवसैनिकाचा मृत्यू

शिवसैनिक सुमंत रुईकर (Sumant Ruikar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दीर्घायुष्य मिळावे म्हणून बीडमधून तिरुपतीला पायी जाण्याचा संकल्प केला होता.

बीड, 26 डिसेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी तिरुपती बालाजीकडे पायी प्रवास करत साकडे घालण्यासाठी निघालेल्या कट्टर शिवसैनिकाचा वाटेतच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सुमंत रुईकर (Sumant Ruikar) असं शिवसैनिकांचं नाव आहे. यापूर्वी देखील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून सुमंत रुईकर यांनी बीड (Beed) ते तिरुपती पायी दिंडी करुन तिरुपती बालाजीला साकडं घातलं होतं. मात्र वाटेतच सुमंत यांना ताप आल्याने कर्नाटकातील रायचूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांचं काल दुपारी निधन झालं. त्यांच्या निधनाने बीडसह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच सुमंत रुईकर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिरुपतीला जाण्यापूर्वीच मृत्यूने गाठलं शिवसैनिक सुमंत रुईकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य मिळावे म्हणून बीडमधून तिरुपतीला पायी जाण्याचा संकल्प केला होता. त्यांनी 1100 किमी पायी चालत जाण्याचा निश्चय केला होता. ते 1 डिसेंबरपासून तिरुपतीच्या दिशेने निघाले होते. उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठिक व्हावी म्हणून सुमंत रुईकर चालत जात होते. मात्र तिरुपतीला पोहोचण्यापूर्वीच त्यांना मृत्यूने गाठलं. हेही वाचा : राज्यपाल vs सरकार संघर्ष: महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपालांच्या भेटीस, करणार 'ही' विनंती सुमंत रुईकर आणि त्यांच्या मित्रानं पायी चालत तिरुपतीला 31 डिसेंबरला पोहोचण्याचा संकल्प केला होता. मात्र, ताप आल्यानं रुईकर यांची प्रकृती बिघडली होती. कर्नाटकमधील रायचूर येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण काल दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. सुमंत यांनी 2019 मध्ये पायी यात्रा केलेली बीड शहरासह जिल्ह्यात सुमंत रुईकर यांचा मित्र परिवार मोठा होता. सुमंत रुईकर यांनी यापूर्वीही 2019 मध्ये उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बीड ते तिरुपती बालाजी पायी यात्रा पूर्ण केली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुमंत रुईकर यांच्या निष्ठेचे कौतुक करत सत्कार केला होता. सोशल मीडियावर फोटो व्हायरल होतोय तर सुमंत रुईकर यांच्या जाण्याने धक्का बसला आहे.
First published:

पुढील बातम्या