मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'त्या' कट्टर शिवसैनिकाच्या मदतीसाठी सरसावली शिवसेना, या नेत्यानं स्विकारलं कुटुंबीयाचं पालकत्व

'त्या' कट्टर शिवसैनिकाच्या मदतीसाठी सरसावली शिवसेना, या नेत्यानं स्विकारलं कुटुंबीयाचं पालकत्व

या कडवट शिवसैनिकाच्या मदतीसाठी शिवसेना पुढे सरसावली आहे.

मुंबई, 27 डिसेंबर: शिवसेनेत (Shiv Sena) आजही कडवट शिवसैनिकांची कमी नाही. याच कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी सुमंतजी रूईकर बीड ते तिरूपती (Beed to Tirupati) येथील बालाजीच्या दर्शनासाठी पायी निघाले होते. पण वाटेत त्यांची तब्येत बिघडली आणि कर्नाटकातील रायचूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बीडसह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र या कडवट शिवसैनिकाच्या मदतीसाठी शिवसेना आता पुढे सरसावली आहे.

सुमंत रुईकर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयाचं पालकत्व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी घेतलं आहे. तर शिवसेना सचिव आणि तिरूपती बालाजी देवस्थान संस्थेचे मानद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ 50 हजार रुपयांची आर्थिक मदत पाठवली आहे.

कट्टर शिवसैनिकाचा मृत्यू

या आधीही सुमंत रूईकर यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी बीड ते तिरूपती पायी वारी केली होती. त्यानंतर त्यांचा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला होता. सुमंत रुईकर यांच्या निधनाने शिवसेना आणखी एका कडवट शिवसैनिकाला मुकली आहे.

तिरुपतीला जाण्यापूर्वीच मृत्यूने गाठलं

शिवसैनिक सुमंत रुईकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य मिळावे म्हणून बीडमधून तिरुपतीला पायी जाण्याचा संकल्प केला होता. त्यांनी 1100 किमी पायी चालत जाण्याचा निश्चय केला होता. ते 1 डिसेंबरपासून तिरुपतीच्या दिशेने निघाले होते. उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठिक व्हावी म्हणून सुमंत रुईकर चालत जात होते. मात्र तिरुपतीला पोहोचण्यापूर्वीच त्यांना मृत्यूने गाठलं.

हेही वाचा-  मुलावर होत असलेल्या आरोपांमुळे संतापले नारायण राणे, सरकारला दिला इशारा

सुमंत रुईकर आणि त्यांच्या मित्रानं पायी चालत तिरुपतीला 31 डिसेंबरला पोहोचण्याचा संकल्प केला होता. मात्र, ताप आल्यानं रुईकर यांची प्रकृती बिघडली होती. कर्नाटकमधील रायचूर येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण काल दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

सुमंत यांनी 2019 मध्ये पायी यात्रा केलेली

बीड शहरासह जिल्ह्यात सुमंत रुईकर यांचा मित्र परिवार मोठा होता. सुमंत रुईकर यांनी यापूर्वीही 2019 मध्ये उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बीड ते तिरुपती बालाजी पायी यात्रा पूर्ण केली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुमंत रुईकर यांच्या निष्ठेचे कौतुक करत सत्कार केला होता. सोशल मीडियावर फोटो व्हायरल होतोय तर सुमंत रुईकर यांच्या जाण्याने धक्का बसला आहे.

First published:

Tags: Beed, Eknath Shinde, Uddhav Thackeray (Politician)