मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /BREAKING : नितेश राणे अजूनही बेपत्ता, अटकेसाठी पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

BREAKING : नितेश राणे अजूनही बेपत्ता, अटकेसाठी पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

 या निर्णयानंतर आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांना कधीही अटक होऊ शकते.

या निर्णयानंतर आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांना कधीही अटक होऊ शकते.

या निर्णयानंतर आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांना कधीही अटक होऊ शकते.

सिंधुदुर्ग, 30 डिसेंबर : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत (Sindhudurg District Cooperative Bank Election) शिवसेना कार्यकर्त्यावर हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांना मोठा धक्का बसला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे नितेश राणेंना कोणत्याही क्षणी अटक होणार आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली असून नितेश राणेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्या हल्ल्याप्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सुनावणीनंतर अखेर नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यांच्यासोबत उमेदवार मनीष दळवींचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे नितेश राणे यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. कोर्टात खटला सुरू असताना नितेश राणे हे बेपत्ता झाले होते. त्यांचा अजूनही शोध लागला नाही. कोर्टाचा निकाल आल्यामुळे नितेश राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांना पूर्ण अधिकार बहाल झाला आहे.

(कोणामुळे जिंकलो सेंच्युरियन टेस्ट? कोहलीने ऐतिहासिक विजयानंतर दिलं उत्तर)

नितेश राणे यांचा शोध घेण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस शोध घेत आहे. जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आहे. नितेश राणे यांना हायकोर्टात धाव घेण्याची मुभा जरी असली तरी त्यांना आधी पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार आहे.

कोर्टाची दोन्ही पक्षाकारांची बाजू पडताळता चौकशी करण्याची आवश्यकता असल्याने दोघांचेही अटक पूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. पोलीस तपासात सहकार्य न करणे तसेच इतर काही तांत्रिक बाबींचा विचार करता न्यायालायने दोघांचेही जामीन अर्ज फेटाळले. या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांच्या युक्तिवादाला यश आले. या निर्णयानंतर आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांना कधीही अटक होऊ शकते.

(भयंकर! चुकीचं इंजेक्शन दिल्याने पेशंटचा मृत्यू, नर्सला अटक)

अटक वाचविण्यासाठी पोलीस कारवाई थांबविण्यासाठी  दोघांनाही अटक पूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घ्यावी लागणार आहे. जिल्हा सत्र न्यायालयाचा  निकाल उशिरा जाहीर झाल्यामुळे आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांना उद्या सकाळ पर्यंतची पहावी लागणार वाट आहे. या निर्णयामुळे  जिल्ह्यात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून चौका चौकात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

First published: