विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेचा निर्णय, 5 ते 10 आमदारांना देणार डच्चू

गेल्या 5 वर्षात ज्या नेत्यांनी कामं केली नाहीत. त्यांच्याविषयी सतत तक्रार करण्यात आली आहे किंवा ज्यांचा मतदारसंघात नाराजीचा सूर आहे अशा आमदारांना शिवसेना तिकीट देणार नाही. तर विद्यमान आमदारांना शिवसेनेकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2019 02:48 PM IST

विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेचा निर्णय, 5 ते 10 आमदारांना देणार डच्चू

मुंबई, 17 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग झालं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक दिग्गजांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनतर विधानसभेच्या 288 जागांसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. यात आता शिवसेना त्यांच्या 5 ते10 आमदारांना डच्चू देणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. अद्याप हे डच्चू देण्यात आलेले आमदार कोण आहेत यावर कोणतीही नावं बाहेर आलेली नाहीत.

गेल्या 5 वर्षात ज्या नेत्यांनी कामं केली नाहीत. त्यांच्याविषयी सतत तक्रार करण्यात आली आहे किंवा ज्यांचा मतदारसंघात नाराजीचा सूर आहे अशा आमदारांना शिवसेना तिकीट देणार नाही. तर विद्यमान आमदारांना शिवसेनेकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे. 5 ते 10 आमदारांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्या जागेवर नवीन उमेदवारांना संधी देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे हे कोणते आमदार असणार याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, शिवसेनेत विधानसभेच्या तोंडावर फूट पडू नये यासाठी या नॉट रिचेबल आमदारांची नाव जाहीर केली नसल्याचं सांगण्यात येत आहे. या आमदरांची नावं आता बाहेर आली तर त्याचा परिणाम विधानसभेच्या प्रचार सभांवर होईल. त्यामुळे शिवसेनेनं सावध पवित्रा घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचं जोर राज्यात दिसू लागला आहे. अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी युतीचं घोडं अद्यापही अडलेलं आहे.

इतर बातम्या - मी कधी तुरुंगात गेलो नाही, शरद पवारांची अमित शहांवर घणाघाती टीका

युतीवर वाद अद्याप मिटला नाही, शिवसेनेनं दिला नवा फॉर्म्युला!

Loading...

रविवारी रात्री शिवसेनेनं 135 जागांसाठी मागणी केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर 9 जागा या मित्रपक्षांसाठी सोडणार असल्याचं त्यांनी प्रस्तावात म्हटलं आहे. त्यामुळे आता हा प्रस्ताव भाजपला मान्य असणार की ते स्वबळावर लढण्याचा निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात विधानसभेतील युतीवर अनेक वेळा चर्चा झाली. पण त्यातून काहीही तोडगा निघाला नाही. त्यात भाजप आणि शिवसेना स्वबळावर निवडणुका लढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. असं असताना आता शिवसेनेनं 135 जागांचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला आहे. यासंबंधीचं वृत 'महाराष्ट्र टाईम्स'नं दिलं आहे. रविवारपासून युतीत जागावाटपाच्या चर्चांना वेग आला आहे.

इतर बातम्या - 'मी पस्तावतोय, मुख्यमंत्र्यांविरोधात राष्ट्रवादीचे 'पोस्टरवॉर'

लोकसभा निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये 50-50 असा फॉर्म्युला दोन्ही पक्षांना मान्य होता. त्यानुसार त्यांना राज्यात यशही मिळालं. पण लोकसभा निवडणुकांनंतर भाजप आणि सेनेमध्ये जोरदार इनकमिंग झालं. त्यामुळे 50-50चा फॉर्म्युल्यानुसार आताही 144 पैकी 135 शिवसेनेला तर 9 जागा मित्रपक्षाला देण्याचा प्रस्ताव शिवसेनेनं ठेवला आहे. भाजपच्या विद्यमान आमदारांच्या 122 जागा यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीतून आयात झालेल्या नेते आणि आमदारांच्या जागेचा समावेश नाही.

इतर बातम्या - धक्कादायक! 'आईने बाबांना चाकूने मारलं', 6 वर्षांच्या मुलाचा नातेवाईकांना फोन

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक दिग्गजांनी पक्षाला रामराम ठोकत सेना आणि भाजपात प्रवेश केला. त्यामुळे राज्यात आघाडीला मोठं खिंडार पजलं असं बोललं जात आहे. या इनकमिंगमुळे दोन्ही पक्षात तगडे उमेदवार आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेना स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार अशाही चर्चा आहेत. दरम्यान, शिवसेना 135 वरून 130 किंवा 125 जागांवर समझोता करू शकते. यावर भाजपकडून दोन दिवसांत कळवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

VIDEO: पुराच्या विळख्यात अडकली शाळा; पत्त्यांसारखी कोसळली इमारत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 02:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...