पुढील पंतप्रधान शिवसेना ठरवणार- संजय राऊत

पुढील पंतप्रधान शिवसेना ठरवणार- संजय राऊत

'देशाचा आगामी पंतप्रधान कोण? हे शिवसेना ठरवणार' अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट भाजपला आव्हान दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 5 फेब्रुवारी : 'देशाचा आगामी पंतप्रधान कोण? हे शिवसेना ठरवणार' अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट भाजपला आव्हान दिलं आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे विधान केलं आहे. 'शिवसेना स्वत:च्या ताकदीनं लोकसभा निवडणुका लढेल आणि जिंकेलं. शिवाय, राज्यात आम्ही मोठ्या भावाची भूमिका बजावली आहे ती यापुढेही बजावणार', अशा शब्दात संजय राऊन यांनी 'राज्यात मोठा भाऊ आम्हीच' याचा पुर्नरूच्चार केला.

तर, 'राज्याचा आगामी मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असेल' असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 'ज्या प्रकारे बाळासाहेब रणनिती ठरवत होते, त्याप्रमाणे आता उद्वव ठाकरे ठरवत आहेत.' असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राजकारणातील रणनितीकार म्हणून ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्वव ठाकरे यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी आगामी पंतप्रधान शिवसेना ठरवणार अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे शिवसेना स्वबळावर लढणार का? हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला.

तर, प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली अशी प्रतिक्रिया यावेळी संजय राऊत यांनी दिली. युतीबाबत बोलायची शिवसेनेला गरज वाटत नाही असं विधान देखील यावेळी संजय राऊत यांनी केलं आहे.

25 - 23चा फॉर्म्युला

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप 25 तर, शिवसेना 23 जागा लढवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पण, दोन्ही पक्षांमध्ये चर्चा मात्र सुरू झालेली नाही. यावेळी शिवसेना भिवंडीच्या जागेसाठी आग्रही असल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता शिवसेना - भाजप युती होणार का? हे पाहावं लागणार आहे.

'सरकार अण्णांच्या जीवाशी खेळतंय'

लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारेंनी उपोषण सुरू केलं आहे. यावर विचारले असता 'सरकार अण्णांच्या जीवाशी खेळतंय' अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

VIDEO: उद्धव ठाकरेंचा नाव न घेता मोदींवर हल्लाबोल

First published: February 5, 2019, 3:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading