मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Shivsena vs Shinde : ठाकरे-शिंदेंचा निवडणूक आयोगात नवा सामना, दोन्ही गटांची दोन नावं सेम टू सेम!

Shivsena vs Shinde : ठाकरे-शिंदेंचा निवडणूक आयोगात नवा सामना, दोन्ही गटांची दोन नावं सेम टू सेम!

शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर आता ठाकरे आणि शिंदे गटात वादाचा पुढचा अंक सुरू झाला आहे. निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना नवीन नाव आणि पक्षचिन्ह यांचे तीन-तीन पर्याय द्यायला सांगितले होते.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 9 ऑक्टोबर : शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर आता ठाकरे आणि शिंदे गटात वादाचा पुढचा अंक सुरू झाला आहे. निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना नवीन नाव आणि पक्षचिन्ह यांचे तीन-तीन पर्याय द्यायला सांगितले होते. निवडणूक आयोगाच्या या आदेशानंतर उद्धव ठाकरे गटाने तीन नावं आणि तीन चिन्ह निवडणूक आयोगापुढे सादर केली आहेत.

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्हमधून या तीन नावांबाबत आणि पक्षचिन्हाबाबत माहिती दिली. तसंच आता एकनाथ शिंदे गटाने दिलेल्या नावांबाबतची माहितीही समोर आली आहे. पण दोन्ही गटांनी दिलेल्या नावांमुळे नवा ट्वीस्ट आला आहे. ठाकरे आणि शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दिलेल्या नावांमधली दोन्ही गटांची दोन नावं सारखीच आहेत, त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही तीन नावं देण्यात आली आहेत. तर एकनाथ शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला दोन नावांचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. यातलं एक नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि दुसरं नाव शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, असं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उद्धव ठाकरेंचं चिन्ह

उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हे चिन्हांचे तीन पर्याय दिले आहेत. शिंदे गटाकडून चिन्हाबाबत कोणते पर्याय देण्यात आले आहेत, याबाबत अजून गुप्तता पाळण्यात आली आहे.

अंधेरीची पोटनिवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाला दोन्ही गटांना लवकरात लवकर नवीन नाव आणि चिन्ह द्यावं लागणार आहे.

First published:

Tags: Cm eknath shinde, Election commission, Shivsena, Uddhav Thackeray