उदयनराजेंबद्दलच्या नव्या चर्चांनी राष्ट्रवादीसह भाजपचीही डोकेदुखी वाढली!

उदयनराजेंबद्दलच्या नव्या चर्चांनी राष्ट्रवादीसह भाजपचीही डोकेदुखी वाढली!

उदयनराजे यांच्याबाबतच्या नव्या चर्चांनी राष्ट्रवादीसह भाजपचीही डोकेदुखी वाढली आहे.

  • Share this:

मुंबई, 1 सप्टेंबर : सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. पण त्याचवेळी उदयनराजे यांच्याबाबतच्या नव्या चर्चांनी राष्ट्रवादीसह भाजपचीही डोकेदुखी वाढली आहे. कारण उदयनराजे भोसले हे शिवसेनेच्याही संपर्कात असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

उदयनराजे भोसले यांची नुकतीच युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यासोबत महत्वाची बैठक झाली. त्यामुळे उदयनराजे शिवसेनेच्याही संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. वरुण सरदेसाई यांनी या भेटीचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करून सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं आहे. मात्र तोंडावर आलेली विधानसभा निवडणूक आणि पक्षबदलासाठी उदयनराजेंच्या सुरू असलेल्या हालचाली, यामुळे ते शिवसेनेच्याही संपर्कात आहेत की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

उदयनराजे आणि भाजप प्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींनी वेग पकडला आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का बसणार, हे आता जवळपास निश्चित आहे. कारण साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाबद्दल सर्वत्र जोरदार चर्चा आहे.

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत सोलापूरमध्ये उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करतील, असं बोललं जात होतं. मात्र उदयनराजे अमित शहा यांच्या नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत थेट दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती आता सूत्रांकडून मिळाली आहे. जोरदार शक्तीप्रदर्शनासह उदयनराजेंना पक्षात घेण्याचा भाजपचा विचार आहे.

दरम्यान, 'मला तर आता असं वाटतंय की राजकारणातूनच अलिप्त व्हावं,' असं म्हणत उदयनराजे यांनी पुन्हा एकदा खळबळ माजवून दिली. एकीकडे उदयनराजेंचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात असताना त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

VIDEO: बंदुकीचा धाक दाखवून सराफावर दमदाटी; भरवस्तीत दुकानाची तोडफोड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2019 11:54 AM IST

ताज्या बातम्या