'NDA एकसंघ ठेवणारा खांब कोसळला', जेटलींच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला शोक

'NDA एकसंघ ठेवणारा खांब कोसळला', जेटलींच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला शोक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जेटली यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

  • Share this:

मुंबई, 24 ऑगस्ट : माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे नेते अरुण जेटली यांचं निधन झालं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जेटली यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. 'अरुण जेटली यांचे निधन देशाला धक्का आहेच. पण शिवसेनेची वैयक्तिक हानी झाली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकसंघ ठेवणारा महत्त्वाचा खांब कोसळला आहे,' अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला.

अरुण जेटली यांचे आज दिल्लीतील AIIMS रुग्णालयात निधन झाले. ते 66 वर्षाचे होते. जेटली यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने AIIMSमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री हर्षवर्धन AIIMSमध्ये जाऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. 6 ऑगस्टला भाजपच्या नेत्या आणि माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाले. त्यानंतर आता जेटली यांच्या निधनामुळे भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन्ही नेत्यांनी मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात महत्त्वाची कामगिरी पार पाडली होती.

गेल्या काही वर्षांपासून जेटली यांच्या प्रकृतीत चढ उतार होत होते. 14 मे 2018 रोजी त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लंटची शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हा ते जवळ जवळ 100 दिवस अर्थ मंत्रालयात आले नव्हते. या काळात पियुष गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. सप्टेंबर 2014मध्ये बॅरिएट्रिक ऑपरेशन करण्यात आले होते. मधुमेहामुळे त्यांचे वजन वाढत होते आणि त्यामुळेच जेटली यांचे ऑपरेशन करण्यात आले होते. तेव्हा प्रथम मॅक्स रुग्णालयात नंतर AIIMSमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. तर त्याआधी त्यांच्या हृदयाचे ऑपरेशन झाले होते.

VIDEO: भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं AIIMS रुग्णालयात निधन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2019 01:57 PM IST

ताज्या बातम्या